ब्रेकिंग
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून कवी आनंद फंदी नाट्यगृहाचे बंदिस्तीकरनाचे काम वेगाने
अद्यावत व प्रशस्त बंदिस्त नाट्यगृह लवकरच रसिकांच्या सेवेत

संगमनेर ( प्रतिनिधी ) काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा मा. मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहरात हायटेक बस स्थानका सह विविध अद्यावत व वैभवशाली इमारती उभ्या राहिल्या आहेत. या इमारतींमध्ये संगमनेर शहराची सांस्कृतिक ओळख असणाऱ्या कवी आनंद फंदी नाट्यगृहाचा समावेश असून या नाट्यगृह बंदिस्तीकरणाचे काम माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सततच्या पाठपुराव्यातून वेगाने सुरू असल्याने हे अद्यावत व प्रशस्त नाट्यगृह लवकरच रसिकांच्या सेवेत दाखल होणार आहे.

संगमनेर शहर हे अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वात वैभवशाली सुसंस्कृत व विकसित शहर म्हणून राज्याला परिचित आहे. या विकासाच्या वाटचालीत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान राहिल्याने त्यांच्या सततच्या विकास कामांमधून आणि दूरदृष्टीतून संगमनेर शहर हे वैभवशाली ठरले आहे. शहरात अनेक अद्यावत इमारतींसह 24 तास मुबलक पाणीपुरवठा,सुसंस्कृत व बंधूभावाचे वातावरण यामुळे अनेक नागरिकांची संगमनेरला राहण्याची पहिली पसंती असते. पवळा हिवरगावकर, कवी अनंत फंदी, शाहीर विठ्ठल उमप यांची भूमी असलेल्या संगमनेरात माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कायम संत आणि कलावंतांचा सन्मान होत असतो.

शहराची सांस्कृतिक गरज ओळखून लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी कवी अनंत फंदी खुले नाट्यगृह अद्यावत केले. 7 फेब्रुवारी 2014 रोजी या नवीन नाट्यगृहाचा उद्घाटन समारंभ तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मा.आ.डॉ.सुधीर तांबे व तत्कालीन नगराध्यक्ष सौ. दुर्गाताई तांबे यांच्या उपस्थितीमध्ये झाला. सातत्याने होणारे सांस्कृतिक कार्यक्रम याकरता या नाट्यगृहाचा उपयोग होणार असून हे बंदिस्त व्हावे याकरता माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या कामासाठी सातत्याने निधी मिळवून पाठपुरावा केला आहे. त्यांच्या माध्यमातून मिळालेल्या निधीमधून हे काम आता युद्धपातळीवर सुरू झाले आहे. या अंतर्गत रंगमंचाची दुरुस्ती करणे, वातानुकूलित यंत्र बसवणे, विद्युत रोषणाई, लिफ्टचे काम, रंगकाम आदी कामे वेगाने सुरू आहेत. या सुरू असल्या कामांची पाहणी अनेक रंगकर्मींनी केली आहे.संगमनेरच्या नाट्य क्षेत्रात डॉ.सोमनाथ मुटकुळे,सूर्यकांत शिंदे, वसंत बंदावणे, राजन झांबरे, प्रा.डॉ.संजय दळवी, शकुंतला मुंदलियार,वंदना जोशी,संगीता परदेशी आदींनीही मोठे योगदान दिले आहे. नव्याने साकारत असलेल्या या बंदिस्त नाट्यगृहामुळे संगमनेरच्या सांस्कृतिक क्षेत्रात मोठी भर पडणार आहे. सोशल मीडियाचा जमाना असला तरीही सांस्कृतिक कार्यक्रमात सह विविध व्याख्याने वैचारिक प्रबोधने ही चळवळ जिवंत ठेवण्याचे काम संगमनेरकरांनी केले असून आगामी काळामध्ये या वैभवशाली नाट्यगृहामुळे संगमनेरच्या सांस्कृतिक क्षेत्राला झळाळी मिळणार आहे. याचबरोबर राज्यभरातील अनेक दिग्गज कलावंत या ठिकाणी विविध नाट्य कलाकृती व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी उपस्थित राहणार असल्याने ही मोठी मेजवानी ठरणार आहे.माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून साकारत असलेले हे अद्यावत नाट्यगृह मुंबई पुणे यासारख्या मेट्रो शहराप्रमाणे होणार असल्याने संगमनेर शहर व तालुक्यातील नागरिकांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.