ब्रेकिंग

चंदनापुरी घाटातील बस अपघातातील जखमी विद्यार्थ्यांना माजी मंत्री थोरात यांच्याकडून तातडीची मदत

चंदनापुरी घाटातील बस अपघातातील जखमी विद्यार्थ्यांना माजी मंत्री थोरात यांच्याकडून तातडीची मदत

चंदनापुरी घाटातील बस अपघातातील जखमी विद्यार्थ्यांना माजी मंत्री थोरात यांच्याकडून तातडीची मदत
इंद्रजीत भाऊ थोरात यांनी भेट देऊन जखमी विद्यार्थ्यांची केली चौकशी
संगमनेर । प्रतिनिधी । संगमनेर तालुका हा गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे केंद्र आहे. ग्रामीण भागातही अत्यंत चांगल्या दर्जाचे शिक्षण दिले असून चंदनेश्वर विद्यालयाची स्कूल बस विद्यार्थ्यांना घेऊन येत असताना घाटामध्ये सुरू असलेल्या एकेरी वाहतुकीमुळे ही स्कूलबस साईड गटारामध्ये पलटली यामध्ये चार-पाच विद्यार्थ्यांना जखमा झाल्या असून ही बातमी कळताच माजी शिक्षण मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी आपल्या यंत्रणा व कार्यकर्त्यांना तातडीने मदतीच्या सूचना दिल्या असून इंद्रजीत भाऊ थोरात यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन विद्यार्थ्यांची अस्थिवायिकपणे चौकशी केली.

चंदनापुरी घाटातील डॉक्टर गुंजाळ हॉस्पिटल येथे या विद्यार्थ्यांना ऍडमिट करण्यात आले असून या विद्यार्थ्यांची थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत भाऊ थोरात विजय राहणे, इंद्रजीत खेमनर ,सरपंच भाऊराव रहाणे, बाळासाहेब सागर, किरण राहणे, बालमशेठ सरोदे ,आनंदराव कडणे, बाळू सरोदे, संदीप सरोदे, दिनकर भालेराव यांसह चंदनापुरी मधील विविध कार्यकर्त्यांनी भेट घेऊन चौकशी केली यावेळी मुख्याध्यापक त्याचप्रमाणे तालुका पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांसह विविध मान्यवर हजर होते.

आज सकाळी विद्यार्थ्यांना चंदनेश्वर विद्यालयात घेऊन येत असताना चंदनापुरी घाटामध्ये सुरू असलेल्या कॉंक्रिटीकरणाच्या कामामुळे एकेरी वाहतूक करण्यात आली आहे. समोरून येणाऱ्या वाहनाने हुल दिल्याने ही MH 14 BA 8932 या क्रमांकाची स्कूल बस साईड गटारामध्ये गेली. यामुळे चार-पाच विद्यार्थ्यांना काही जखमा झाले आहेत मात्र कुणीही गंभीर जखमी नसल्याने काळजी करण्याचे कारण नाही.स्कूलबस ची बातमी कळताच माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपले सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना तातडीने या विद्यार्थ्यांना मदत करण्याच्या सूचना दिल्या. यानुसार यशोधन कार्यालयाचे प्रमुख तथा थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत भाऊ थोरात, विजय राहणे यांनी तातडीने घटनास्थळाला भेट दिली. यानंतर विद्यार्थी डॉ. राधेश्याम गुंजाळ हॉस्पिटल येथे ऍडमिट असून या विद्यार्थ्यांची आस्तेवाईकपणे चौकशी करून सर्वांना दिलासा दिला. यावेळी इंद्रजीत भाऊ थोरात यांनी मुख्याध्यापक सर्व विद्यार्थी व पालक यांच्याशी संवाद साधून त्यांना दिलासा दिला. घटना दुर्दैवी असून जखमी झालेले विद्यार्थी यांच्यावर उपचार सुरू आहेत पालकांनी व नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन त्यांनी केले.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!