ब्रेकिंग

कोकणगाव शिवापुर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी थोरात गटाच्या राधिका पवार यांची निवड

कोकणगाव शिवापुर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी थोरात गटाच्या राधिका पवार यांची निवड

कोकणगाव शिवापुर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी थोरात गटाच्या राधिका पवार यांची निवड
संगमनेर । प्रतिनिधी । तालुक्यातील राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या व विकासाच्या बाबतीत अग्रेसर असणाऱ्या कोकणगाव शिवापूर  ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या गटाच्या व शेतकरी विकास मंडळा च्या  उमेदवार सौ राधिका बाळासाहेब पवार यांचा दणदणीत विजय झाला आहे.
जाहिरात

  गेल्या काही दिवसांपूर्वी कोकणगाव शिवापुरचे उपसरपंच अरुणभाऊ जोंधळे यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिला होता. अतिशय चांगले व उल्लेखनीय काम त्यांनी अडीच वर्षाच्या कालखंडात केले होते. अरुण भाऊ जोंधळे यांनी राजीनामा दिल्यानंतर सदरची जागा रिक्त झाली होती. सदर ग्रामपंचायत ही 11 सदस्य आहेत पैकी 8 मते मिळवून सौ राधिका बाळासाहेब पवार विजयी झाल्या आहेत.या प्रक्रियेत तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी दादा जोंधळे, सोमनाथ पाटील जोंधळे ,दीपक जोंधळे, गोरख जोंधळे, बाळासाहेब पवार ,अरुण जोंधळे ,अनिल जोंधळे, बाळासाहेब टेलर ,राजेंद्र पारधी, चिमाजी जोंधळे लहानभाऊ जोंधळे, मच्छिंद्र पवार, दिलीप जोंधळे यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी ग्रामसेवक श्री शेख यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.राधिका पवार यांच्या निवडीबद्दल लोकनेते बाळासाहेब थोरात, डॉ. जयश्रीताई थोरात, इंद्रजीतभाऊ थोरात, रणजीतसिंह देशमुख आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!