ब्रेकिंग

शिंदेंच्या कार्यकाळातील प्रभावी विक्रमी जनहिताच्या कामामुळेच महाराष्ट्रात महायुतीचे सरकार – अजय बोरस्ते

शिंदेंच्या कार्यकाळातील प्रभावी विक्रमी जनहिताच्या कामामुळेच महाराष्ट्रात महायुतीचे सरकार – अजय बोरस्ते

शिंदेंच्या कार्यकाळातील प्रभावी विक्रमी जनहिताच्या कामामुळेच महाराष्ट्रात महायुतीचे सरकार – अजय बोरस्ते

शिर्डी । प्रतिनिधी ।

ज्यावेळी शिवसेना हिंदुहृदय सम्राटांच्या विचारांपासून दूर गेली तेंव्हा शिवसेना नेते एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली बंड झाले. त्याची परिणीती महाराष्ट्रात त्यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार स्थापन झाले. मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत त्यांनी केलेली 24 तास जनतेची सेवा, महाराष्ट्रातील महिला, कष्टकरी, शेतकरी, जेष्ठ नागरिक यांच्यासाठी असंख्य योजना दिल्या . त्यामुळे प्रत्येकाचा सन्मान वाढला आणि एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता वाढली. विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाले. आजही जनतेच्या मनातील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेच आहेत. बाळासाहेबांच्या विचारांना पुढे नेणाऱ्या शिवसेनेचं सक्षम नेतृत्व शिंदे साहेबां कडेच जाते हे सिद्ध झाले आहे.या शिवसेना परिवाराचे सदस्य होण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक पुढे येत आहेत.‌ शिवसैनिकांनी या सुवर्णसंधीचा फायदा घेऊन घर तेथे शिवसैनिक उभा करावा असे आवाहन शिवसेनेचे नाशिक जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी केले.

जाहिरात

शिवसेना सभासद नोंदणी संदर्भात आढावा बैठक आज शिर्डी येथील विश्राम गृह येथे पार पडली यावेळी बोरस्ते बोलत होते. शिर्डी लोकसभा मतदारसंघात आम्ही दोन्ही जिल्हाप्रमुख सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने विक्रमी शिवकार्य सदस्य नोंदणी करू असा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांनी व्यक्त प्रास्ताविकात केला. यावेळी माजी खासदार सदाशिव लोखंडे व माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, सौ . विमल पुंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख कमलाकर कोते, नितीन औताडे ,महिला आघाडी जिल्हा प्रमुख विमल पुंडे, युवासेना जिल्हा प्रमुख शुभम वाघ, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जिल्हा प्रमुख जितेंद्र जाधव, राहुरी तालुका प्रमुख देवेंद्र लांबे, संगमनेर तालुका प्रमुख रमेश काळे, राहता तालुका प्रमुख सागर बोठे, कोपरगाव शेतकरी सेना तालुका प्रमुख बाबासाहेब बढे, कोपरगावचे रावसाहेब थोरात, युवासेनेचे अभिषेक आव्हाड, राहाता तालुका महिला आघाडी प्रमुख वनिता जाधव, श्रीरामपूर तालुका प्रमुख सविता वाडीले , कोपरगाव तालुका प्रमुख मीनाक्षी वाकचौरे व आरती गाडे, मुमताज शेख, अक्षय सदाफळ,अमोल महाले,युवा सेना तालुका प्रमुख प्रणीत भालेराव, प्रतीक वाकचौरे, साई वाणी, संग्राम सदा फळ या सह कोपरगाव , संगमनेर, श्रीरामपूर , राहाता, नेवासा, अकोले तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संखेने उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!