ब्रेकिंग

रामवाडीत तरुणाचा खून तर अवघ्या काही तासात खुनी जेरबंद

जाहिरात मो -7756045359
रामवाडीत तरुणाचा खून तर अवघ्या काही तासात खुनी जेरबंद

कोपरगाव । प्रतिनिधी । कोपरगाव शहर हद्दीतील रामवाडी परिसरात काल दिनांक 1 मार्च रोजी रात्री घडलेल्या खून प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली आहे. हनुमान मंदिरासमोर रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास 33 वर्षीय तरुणाचा दगड, वीट व लोखंडी कत्तीने मारहाण करून खून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव नवनाथ माधव कानफाटे असे आहे.


या प्रकरणी मयताचा भाऊ समाधान माधव कानफाटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, मयत नवनाथ याचे आरोपींच्या बहिणीसोबत प्रेमसंबंध होते. याच कारणावरून आरोपींकडून त्याला यापूर्वीही धमकावण्यात आले होते, असा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, काल रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास नवनाथ याला फोन करून हनुमान मंदिरासमोर बोलावण्यात आले. “तू आमच्या बहिणीच्या गावाला का जातोस” या कारणाचा राग मनात धरून आरोपींनी आधीच कट रचल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर आरोपींनी लोखंडी कत्ती, वीट आणि दगडांनी नवनाथ यांच्या डोक्यावर वार करून त्याचा खून केल्याचा आरोप करण्यात आला आहे.या प्रकरणातील आरोपी नामे करण सुदान मोरे, संजय सुदाम मोरे, समाधान कचरू पोटे (सर्व रा. रामवाडी) तसेच रोहित दयानंद पवार (रा. वारी) अशी असून पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे.घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधीक्षक अमोल भारती तसेच पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. घटनास्थळाची पाहणी करण्यात आली असून अधिक तपासासाठी फॉरेन्सिक पथकालाही बोलावण्यात आले होते. या घटनेनंतर शहर पोलिसांनी वेगाने तपास सुरू करून अवघ्या काही तासांत चारही आरोपींना अटक केली. पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस करत आहेत.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!