ब्रेकिंग

अभ्यास, व्यवस्थापन आणि समाजकारणाची सांगड; सत्यजित तांबेंच्या नेतृत्वाची ‘व्हिजनरी’ वाटचाल

अभ्यास, व्यवस्थापन आणि समाजकारणाची सांगड; सत्यजित तांबेंच्या नेतृत्वाची ‘व्हिजनरी’ वाटचाल

अभ्यास, व्यवस्थापन आणि समाजकारणाची सांगड; सत्यजित तांबेंच्या नेतृत्वाची ‘व्हिजनरी’ वाटचाल

संगमनेर । विनोद जवरे । राजकारण हे केवळ सत्तेचे माध्यम न राहता समाजाच्या विकासासाठी प्रभावी साधन ठरावे, यासाठी अभ्यासू आणि आधुनिक दृष्टिकोन असलेल्या नेतृत्वाची गरज असते. सत्यजित तांबे यांच्या कार्यपद्धतीकडे पाहताना अभ्यास, व्यवस्थापन, सामाजिक बांधिलकी आणि युवकांच्या प्रश्नांवरील सातत्यपूर्ण काम यांचा संगम दिसून येतो, असे त्यांचे वडील तथा जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक डॉ. सुधीर तांबे यांनी व्यक्त केले आहे.

लहानपणापासूनच सत्यजित, हर्षल आणि करण हे तिघेही अभ्यासात हुशार होते. सत्यजित यांनी वैद्यकीय किंवा अकादमिक क्षेत्रात करिअर करावे, अशी आपली इच्छा होती; मात्र लहान वयापासूनच त्यांना समाजकार्याची आवड असल्याने त्यांनी सामाजिक आणि सार्वजनिक जीवनाची वाट निवडली, असे डॉ. तांबे सांगतात.2004 मध्ये आपल्या राजकीय व सामाजिक कार्याचा आढावा संगणकाच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडणारी पुस्तिका सत्यजित यांनी तयार केली होती. त्यातूनच त्यांची व्यवस्थापनशास्त्राकडे असलेली ओढ आणि नवीन पद्धतीने विचार करण्याची प्रवृत्ती जाणवत होती. पुढे त्यांनी युवा नेतृत्व, व्यवस्थापन आणि सार्वजनिक जीवनाशी संबंधित विविध विषयांचा अभ्यास केला.विद्यार्थीदशेपासूनच NSUI, युवक संघटना आणि युवक काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी काम केले. पुढे अहमदनगर जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले. त्यांच्या सार्वजनिक जीवनातील या प्रवासात युवक, शिक्षण, रोजगार, आरोग्य, उद्योग आणि ग्रामीण भागातील प्रश्नांना त्यांनी सातत्याने महत्त्व दिले.विधान परिषदेत काम करण्याची संधी मिळाल्यानंतर विविध विषयांची अभ्यासपूर्ण मांडणी करण्यावर त्यांनी भर दिला. युवकांच्या रोजगाराचा प्रश्न, नाशिक-पुणे रेल्वे, शेतकऱ्यांचे प्रश्न, शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न, तसेच युवकांना विविध सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी इनोव्हेशन सेंटरसारख्या संकल्पनांचा पाठपुरावा केल्याचे डॉ. तांबे यांनी नमूद केले.

समाजकारणाला आधुनिक व्यवस्थापनाची जोड

सत्यजित तांबे हे केवळ राजकीय विषयांपुरते मर्यादित न राहता अर्थशास्त्र, व्यवस्थापन, कायदा, उद्योग, शिक्षण आणि आरोग्य या विषयांचा अभ्यास करतात, असे डॉ. तांबे सांगतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध विषयांवर ते आपली भूमिका मांडत असून, युवकांशी सातत्याने संवाद साधण्यावर त्यांचा भर असल्याचेही त्यांनी नमूद केले.कोरोना काळात विविध क्षेत्रांतील संपर्काचा उपयोग नागरिकांना मदत करण्यासाठी करण्यात आला. लॉकडाऊनच्या काळात कोळवाडे परिसरातील डोंगरावर वृक्षारोपण करून फादर हर्मन बाकर यांच्या स्मरणार्थ ‘हर्मन हिल’ उभारण्याच्या उपक्रमातही त्यांनी सहभाग घेतला.जयहिंद लोकचळवळीच्या माध्यमातून सुरू असलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्याला सत्यजित यांनी पाठिंबा दिला. गरीब-श्रीमंत असा भेद न ठेवता सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची त्यांची भूमिका असल्याचे डॉ. तांबे यांनी सांगितले.

अभ्यासिका, युवक आणि रोजगारावर भर

युवकांना शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी अभ्यासिका उभारण्यावरही त्यांनी भर दिला. डॉ. तांबे यांच्या माहितीनुसार, सुमारे दीड वर्षाच्या कालावधीत मतदारसंघात 50 अभ्यासिका निर्माण करण्यात आल्या आहेत.साहित्य, कला, क्रीडा, समाजकारण, राजकारण आणि सहकार या विविध क्षेत्रांमध्ये सत्यजित यांची रुची असून, व्यस्त सार्वजनिक जीवनातही वाचन आणि चिंतनासाठी ते वेळ देतात, असे डॉ. तांबे यांनी म्हटले आहे.

‘नवीन पिढीला दिशा देण्याची गरज’

आजच्या बदलत्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीत पारंपरिक राजकारणासोबत आधुनिक व्यवस्थापनशास्त्र, तंत्रज्ञान आणि युवकांचा सहभाग यांची सांगड घालणे आवश्यक आहे. तरुणांना संघटित करून त्यांना योग्य दिशा देण्यासाठी सत्यजित तांबे यांच्याकडून भविष्यात अधिक व्यापक काम घडावे, अशी अपेक्षा डॉ. सुधीर तांबे यांनी व्यक्त केली.सार्वजनिक जीवनात अभ्यासपूर्ण मांडणी, विविध क्षेत्रांशी संवाद आणि युवकांच्या प्रश्नांवर काम करण्याची पद्धत ही सत्यजित तांबे यांच्या कार्याची प्रमुख वैशिष्ट्ये असल्याचे त्यांच्या वडिलांनी मांडलेल्या या लेखाजोख्यातून अधोरेखित होते.

– डॉ. सुधीर तांबे
संस्थापक, जयहिंद लोकचळवळ

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!