ब्रेकिंग

कोपरगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा खोल्यांसाठी ९६ लक्ष निधी मंजूर – आ. आशुतोष काळे

कोपरगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा खोल्यांसाठी ९६ लक्ष निधी मंजूर – आ. आशुतोष काळे

कोपरगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा खोल्यांसाठी ९६ लक्ष निधी मंजूर – आ. आशुतोष काळे

कोळपेवाडी । प्रतिनिधी । कोपरगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा खोल्यांसाठी निधी मिळावा यासाठी केलेल्या प्रयत्नातून कोपरगाव तालुक्यातील नवीन ०८ शाळा खोल्या बांधण्यासाठी ९६ लक्ष निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.

कोपरगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांना नवीन खोल्यांची आवश्यकता असल्यामुळे कोपरगाव तालुक्यातील विविध गावातील शाळा खोल्या नव्याने बांधणे गरजेचे होते. त्यासाठी शाळा खोल्यांना निधी मिळावा याबाबत जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव दाखल करून पाठपुरावा सुरु होता. त्या पाठपुराव्याची दखल घेवून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सन २०२५-२६ च्या जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत कोपरगाव तालुक्यातील धामोरीडांगेवाडीडाऊच बु. व रांजणगाव देशमुख (खालकर मळा) ह्या ४ गावातील शाळांमध्ये नव्याने ०८ नवीन शाळा खोल्या बांधण्यासाठी प्रत्येकी १२ लक्ष याप्रमाणे ९६ लक्ष रुपये निधी मंजूर केला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे. त्याबद्दल आ.आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे, जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पा. यांचे आभार मानले.शिक्षण हे देशाच्या प्रगतीचा पाया आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार सुविधा मिळाव्यात या दृष्टिकोनातून शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांचा अभाव दूर करण्यासाठी जिल्हा परिषद शाळांच्या नवीन खोल्यांना मंजूर झालेला ९६ लक्ष रुपयांचा निधी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यामुळे भविष्यात शाळांमधील शैक्षणिक वातावरणात सकारात्मक बदल होणार आहे. उर्वरित गावातील शाळा खोल्यांना देखील लवकरात लवकर निधी मिळावा यासाठी पाठपुरावा सुरु असून त्या शाळा खोल्यांना देखील निधी प्राप्त होवून त्या शाळा खोल्यांचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी सांगितले आहे. जिल्हा परिषद शाळांच्या नवीन खोल्यांसाठी ९६ लक्ष निधी मंजूर करून आणल्याबद्दल धामोरीडांगेवाडीडाऊच बु. व रांजणगाव देशमुख गावातील नागरीकांनी आ.आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!