संगमनेर तालुक्यातील रस्ते मजबुतीकरण कामासाठी 85 लाख रुपयांचा निधी मंजूर – आमदार सत्यजित तांबे
संगमनेर तालुक्यातील रस्ते मजबुतीकरण कामासाठी 85 लाख रुपयांचा निधी मंजूर – आमदार सत्यजित तांबे

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनात तालुक्यातील रस्त्यांचे जाळे अधिक मजबूत होणार

नेहमी गोरगरीब व सर्वसामान्य नागरिकांच्या विकासासाठी काम करणारे लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील विविध रस्त्यांकरता जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण 2025- 26 मध्ये 3054, 3068 ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरण योजनेअंतर्गत जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 85 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.यामध्ये मंगळापुर येथील राष्ट्रीय महामार्ग 50 ते मंगळापूर रस्ता सुधारणा करणे कामाकरता 15 लाख रुपयांचा निधी ,निमगाव बुद्रुक येथील नांदुरी दुमाला ते निमगाव बुद्रुक रस्ता सुधारण्या कामासाठी 15 लाख रुपयांचा निधी ,धांदरफळ खुर्द येथील धांदरफळ खुर्द ते डोंगरे वस्ती रस्ता सुधारणा करणे 15 लाख रुपये ,वडगाव लांडगा येथील जवळेकडलग रस्ता सुधारणा करणे 10 लाख रुपये, धुपे येथील दिघे वस्ती रस्ता सुधारले 10 लाख रुपये, तर चिखली येथील मेमाने वस्ती रस्ता सुधारणे कामे करता 20 लाख रुपये असे एकूण 85 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीमधून सदर रस्त्यांचे मजबुतीकरण व रुंदीकरण करण्यात येणार आहे त्यामुळे संगमनेर तालुक्यातील रस्त्यांचे जाळे अधिक समृद्ध होणार असून नागरिकांना दळणवळणासाठी मोठी सोय होणार आहे.
हा निधी मिळून दिल्याबद्दल लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांचे मंगळापुर, चिखली, धुपे ,निमगाव बुद्रुक, धांदरफळ खुर्द ,वडगाव लांडगा जवळेकडलग येथील ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.
काम बोलतोय नाणं खणखणीत आहेमहाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यातील विकास कामांचा वेग कायम आहे. याउलट सध्याचे सत्ताधारी काम करण्यापेक्षा निगेटिव्ह भूमिका घेत आहे . अशांत झालेले संगमनेर, दडपशाही यामुळे संगमनेर शहरातील व तालुक्यातील नागरिक अस्वस्थ असून सर्व जनता लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या पाठीशी पुन्हा एकवटली आहे.



