छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त तुळजाभवानी देखाव्याने परिसर सजला
स्वाभिमानी संगमनेर शहर व तालुका शिवजन्मोत्सव समितीच्या कार्यक्रमाला नागरिकांची मोठी पसंती

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त तुळजाभवानी देखाव्याने परिसर सजला

ढोल ताशांचा गजर, मैदानी साहसी खेळ, फुल व फटाक्यांची आतिषबाजीत शिवघोषाने दुमदुमले संगमनेर
स्वाभिमानी संगमनेर शहर व तालुका शिवजन्मोत्सव समितीच्या कार्यक्रमाला नागरिकांची मोठी पसंती

स्वाभिमानी संगमनेर शहर व तालुका शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने आयोजित महाराजांच्या जयंतीनिमित्त भव्य व आकर्षक आई तुळजाभवानी देखाव्याचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा येथे मोठ्या उत्साहात झाले. यावेळी मा.आ.डॉ.सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, सौ.दुर्गाताई तांबे, डॉ.जयश्रीताई थोरात, नगराध्यक्ष डॉ.मैथिलीताई तांबे, उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख, काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे,संदीप शेठ साळुंखे, विश्वासराव मुर्तडक, निखिल पापडेजा,अजय फटांगरे, गणेश मादास, आशिष कोठवळ,गोपी शिंदे, अनुज अरगडे, विशाल ढोले, गौरव डोंगरे,राहुल चौधरी, सौरभ उमरजी, एकनाथ श्रीपाद,अमर कतारी, वैष्णव मुर्तडक, यांच्यासह संगमनेर मधील शिवजयंती समिती, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, शिवसेना, शिवजयंती युवक उत्सव समिती, विविध व्यापारी संघटना, सेवाभावी संघटना,बजरंग दल, यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी, नागरिक महिला व तरुणाई मोठ्या संख्येने उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या पाठीमागे आई तुळजाभवानीचा भव्य आकर्षक देखावा साकारण्यात आला आहे. फुलांची सजावट, विद्युत रोषणाई, प्रसन्न मूर्ती, महाराजांचे स्मारक हा विलोभनीय दृश्य सोहळा पाहण्यासाठी शहरातील हजारो नागरिकांनी मोठी गर्दी केली. यावेळी किल्ले शिवनेरी ढोल ताशा पथकाने सादर केलेला कार्यक्रम याचबरोबर तरुणांनी मर्दानी खेळाचे दाखवलेले प्रात्यक्षिक आणि फुलांची व फटाक्यांची झालेली आतिषबाजी संस्मरणीय ठरली. प्रचंड जयघोषात तुळजाभवानीची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची झालेली आरती आणि त्यानंतर झालेल्या शिवघोशाच्या निनादाने संगमनेर शिवमय झाले.यावेळी बोलताना आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर बस स्थानकासमोर महाराजांचे भव्य स्मारक होणार आहे. जे लोक आता स्मारकाची भाषा बोलत आहे. ती कुठेही नव्हती किंवा त्यांचा कोणताही पाठपुरावा नाही. 2018 मध्ये नगरपालिकेने प्रथम प्रस्ताव केला आणि 2023 मध्ये आपण तत्कालीन परिवहन मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून जागा मंजूर करून घेतली आता शासन मदतीशिवाय लोकवर्गणीतून आणि नगरपालिकेच्या सहकार्यातून भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. आई तुळजाभवानीचा आशीर्वाद महाराष्ट्राला आणि महाराजांना होता हा देखावा अत्यंत भव्य दिव्य असून आपणास सर्वांना आईचा आशीर्वाद आहे अठरापगड समाजाला घेऊन महाराजांनी स्वराज्य निर्माण केले. हाच वारसा घेऊन सर्व समाजांना एकत्रित घेऊन शहर व तालुक्याला पुढे नेण्यासाठी सर्वांनी काम करायचे असल्याचे ते म्हणाले.

तर मा.आ.डॉ.सुधीर तांबे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ही सर्वप्रथम महात्मा फुले यांनी शोधली महाराज हे एका जाती धर्माचे नव्हते तर बहुजनांचे राजे होते मात्र त्यांच्या नावावर सध्याचे होणारे राजकारण हे अत्यंत दुर्दैवी आहे. महाराजांचे विचार प्रेरणादायी असून सर्वांनी एकत्रित येऊन समाजासाठी काम करावे असे आवाहन त्यांनी केले.तर डॉ.जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, आई तुळजाभवानी चा आशीर्वाद घेऊन आणि महाराजांची प्रेरणा घेऊन आपल्या सर्वांना यापुढे काम करायचे आहे. महाराजांच्या जीवनात ही संकट आली. वेळेला त्यांनी गड किल्ले दिले परंतु ते परतही घेतले. महाराजांच्या महाराष्ट्रात सध्या शेतकरी आत्महत्या करतो आहे .महिलांची दुर्दशा आहे .तरुणांची बेरोजगारी आहे. हे अत्यंत दुर्दैवी असून आपला तालुका विचारांचा आणि परंपरेचा तालुका आहे. जपण्यासाठी सर्व तरुणांनी आता अधिक जोमाने काम करावे असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमाचे स्वागत शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी केले प्रास्ताविक माजी नगराध्यक्ष विश्वासराव मुर्तडक यांनी केले. तर युवक काँग्रेस शहराध्यक्ष निखिल पापडेजा यांनी आभार मानले. यावेळी शहरातील नागरिक महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जगासाठी सदैव प्रेरणादायी – माजी मंत्री बाळासाहेब थोरात
सर्व संत समाज सुधारक यांचे विचार घेऊन समाजातील अठरापगड जाती व बारा बलुतेदारांचे स्वराज्य निर्माण करणारे महाराजांनी स्त्रियांचा आदर, गोरगरीब शेतकरी सर्वसामान्य नागरिकांची काळजी, लोकशाही आणि मानवता निर्माण करणारे स्वराज्य निर्माण केले. महाराजांचे विचार घेऊन काम केल्यास जगातील अशांतता निर्माण होण्याबरोबर खरे सुराज्य निर्माण होईल. त्यांचे विचार हे जगासाठी सदैव प्रेरणादायी असल्याचे गौरवोजगार काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी डॉ.संजय मालपाणी व शहरातील इतर मान्यवर उपस्थित होते.
आई तुळजाभवानीचा देखावा तीन दिवस नागरिकांसाठी खुलाछत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा येथे स्वाभिमानी संगमनेर शहर व तालुका शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने आई तुळजाभवानीचा देखावा खुला करण्यात आला असून दर्शनासाठी हा तीन दिवस राहणार आहे. या उपक्रमामध्ये नागरिकांचा मोठा सहभाग हे वैशिष्ट्य राहिले आहे.



