ब्रेकिंग

छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य अश्वारूढ पुतळा लवकरच उभारणार – आमदार सत्यजीत तांबे

भव्य मिरवणुकीसह मोठ्या उत्साहात संगमनेर शहरात शिवजयंती साजरी

छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य अश्वारूढ पुतळा लवकरच उभारणार – आमदार सत्यजीत तांबे

जाहिरात मो -7756045359


भव्य मिरवणुकीसह मोठ्या उत्साहात संगमनेर शहरात शिवजयंती साजरी

जाहिरात मो -7756045359

पारंपारिक वेशभूषा, मर्दानी खेळ, ढोल ताशांचा गजरात पुष्पवृष्टी लक्षवेधी

संगमनेर । प्रतिनिधी । ढोल ताशांचा गजर, महिलांनी केलेली पारंपारिक वेशभूषा, मर्दानी खेळ, व छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा व विविध ठिकाणी झालेली पुष्पवृष्टी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात संगमनेर शहरात महाराजांची भव्य मिरवणूक झाली असून येत्या वर्षामध्ये लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर बसस्थानकासमोर शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारणार असल्याचे आमदार सत्यजित तांबे यांनी म्हटले आहे.

संगमनेर नगरपरिषद, संभाजी ब्रिगेड, मराठा महासंघ व विविध सामाजिक संघटना यांच्या वतीने संगमनेर नगरपरिषद बाजारपेठ , सय्यद बाबा चौक, तेली खुंट, मेनरोड या मार्गी झालेल्या या मिरवणुकीमध्ये शहरातील हजारो नागरिकांनी सहभाग घेतला. मा.आ.डॉ सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे, सौ दुर्गाताई तांबे, उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख,रामहरी कातोरे अजय फटांगरे, सोमेश्वर दिवटे , नगरसेवक विश्वासराव मुर्तडक, दिलीपराव पुंड, किशोर टोकसे, किशोर पवार , नितीन अभंग, शैलेश कलंत्री, गजेंद्र अभंग, भारत बोराडे ,सौ.सीमाताई खटाटे, सौ अर्चना दिघे, शोभाताई बाळासाहेब पवार, सौ प्राची काशीद, डॉ.अनुराधा सातपुते ,सौ वनिता गाडे, सौ मालती डाके, सौ दिपाली पांचारिया, गणेश गुंजाळ, अमजद पठाण ,श्रीमती विजया गुंजाळ , सौ. सरोजना पगडाल, सौ. प्रियंका शहा डॉ.दानिश, निखिल पापडेजा, मुख्याधिकारी दयानंद गोरे ,राजेंद्र गुंजाळ, यांच्यासह संगमनेर शहरातील विविध पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण जगाचे आराध्य दैवत आहे. त्यांचा विचार हा देशातील नव्हे तर जगातील प्रत्येक पिढीसाठी सदैव प्रेरणादायी ठरणार आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर बस स्थानकासमोर महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे. एक वर्षांमध्ये या पुतळ्याचे काम पूर्ण होऊन पुढील वर्षी जयंती आपण मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरी करू त्याचबरोबर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण कृती पुतळा, संविधान स्मारक शंभर फूट उंचीचा तिरंगा उभारून संगमनेर बस स्थानक परिसर अत्यंत सुंदर करण्यासाठी आपला शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा सुरू असून येत्या वर्षांमध्ये हे भव्य स्मारक करू असे ते म्हणाले.तर डॉ.मैथिलीताई तांबे म्हणाल्या की महाराजांचा विचार घेऊन सर्वांना सोबत घेत संगमनेर शहर आदर्श करण्यासाठी आपण कटिबद्ध असून नागरिकांचाही मोठा सहभाग मिळत आहे असे त्या म्हणाल्या. यावेळी माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, सौ दुर्गाताई तांबे यांनीही सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या.नगरपालिका व सर्व संघटनांच्या वतीने सुरू झालेल्या या मिरवणुकीमध्ये सर्व नगरसेविका भगिनींनी पारंपारिक पद्धतीने फेटे परिधान केले. मर्दानी खेळ, ढोल ताशांचा गजर, घोडेस्वार, बाल शिवाजी, या मिरवणुकीने संगमनेर करांचे लक्ष वेधले ठिकठिकाणी झालेली फटाक्यांची आतिषबाजी आणि पुष्पवृष्टीने संपूर्ण वातावरण शिवमय झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा येथे सर्व नागरिकांनी एकत्र येऊन महाराजांची भव्य आरती केली. यावेळी झालेली पुष्पवृष्टीचे दृश्य विलोभनीय होते.हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज या घोषणांनी संगमनेर नगरी दुमदुमून गेली.

शहरात व तालुक्यात विविध ठिकाणी जयंती साजरी

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या वतीने अमृत उद्योग समूहात भव्य उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली यावेळी माजी आमदार डॉ सुधीर तांबे, पांडुरंग पाटील घुले यांच्या सह विविध पदाधिकारी उपस्थित होते तर जोरवे येथे झालेले मर्दानी खेळ आणि भव्य मिरवणुकीमध्ये इंद्रजीत भाऊ थोरात यांनी सहभाग घेतला. शहरात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहाने शिवजयंती साजरी झाली याचबरोबर यशोधन कार्यालय व विविध सहकारी संस्थांमध्ये ही छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी झाली.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!