ब्रेकिंग
अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या 50 विद्यार्थ्यांची 20 लाख पॅकेजवर जपानमध्ये निवड

संगमनेर । प्रतिनिधी । मा.शिक्षणमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजमधील सिव्हिल विभागातील 50 विद्यार्थ्यांची जपानमधील चिक्कूजीन या नामांकित कंपनीमध्ये वार्षिक 20 लाख रुपये पॅकेजवर निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश यांनी दिली आहे.

अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजमधून जपान कंपनीमध्ये झालेल्या विद्यार्थ्यांच्या निवडीबाबत अधिक माहिती देताना प्राचार्य डॉ. एम ए वेंकटेश म्हणाले की, माजी शिक्षण मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात व मा.आ.डॉ.सुधीर तांबे आणि संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त सौ शरयूताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज ने नॅक चा ए प्लस दर्जा मिळवला असून एनबीएचे मानांकन मिळवले आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन होत असते याचबरोबर विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्याशी समन्वय करून विद्यार्थ्यांना थेट नोकरीच्या संधी मिळाव्या याकरता स्वतंत्र प्लेसमेंट विभाग कार्यरत आहे. या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना चांगल्या पॅकेजवर चांगल्या नोकरी मिळत आहे याचबरोबर विद्यार्थ्यांना जपानी भाषेचे शिक्षण सुद्धा दिले जात आहे.या भाषेच्या शिक्षणामुळे ए टू जे हिरामिकी इंडिया लिमिटेड पुणे व आशिया टू जपान यांच्यामार्फत अमृतवाहिनीच्या विद्यार्थ्यांना जपान मधील कंपनीमध्ये नोकरीची संधी मिळाली आहे. या निवडीसाठी आलेल्या जपानच्या पाहुण्यांनी अमृतवाहिनीतील सपुरा जापनीज प्रशिक्षण पाहणी करून हे केंद्र विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी महत्त्वाचे असल्याचे त्यांनी म्हटले. याचबरोबर संस्थेतील स्वच्छ व विविध वृक्षांनी नटलेला सुंदर परिसराचे आणि संस्थेतील शिस्त व विविध उपक्रमांचे ही कौतुक केले. सिव्हिल विभागातील 50 विद्यार्थ्यांची 20 लाख इतक्या आकर्षक पॅकेजवर निवड झाल्याने विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी संधी मिळाली आहे. या विद्यार्थ्यांच्या नोकरीसाठी ए टू जे हिरामिकी इंडिया लिमिटेड पुणे चे प्रज्वल चन्नगिरी यांनी विशेष प्रयत्न केले.या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मा.महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मा.आ.डॉ.सुधीर तांबे, संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त सौ शरयूताई देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, अकॅडमी डायरेक्टर डॉ.जे.बी.गुरव, प्राचार्य डॉ.एम.ए.वेंकटेश यांनी अभिनंदन केले आहे.

जपानी भाषेच्या प्रशिक्षणामुळे आंतरराष्ट्रीय संधी
अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी जपानी भाषेचे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. अत्यंत अत्याधुनिक असलेल्या या प्रशिक्षण केंद्रातून विद्यार्थ्यांना जपानी भाषा शिकवली जात असून यामुळे जपान सह आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना मोठ्या पॅकेजवर मोठी संधी उपलब्ध होत आहे यातूनच सिव्हिल विभागाच्या 50 विद्यार्थ्यांना चिक्कूजीन या कंपनीत 20 लाख पॅकेज वर झालेली निवड ही संस्थेसाठी अभिमानास्पद असल्याचे सौ शरयूताई देशमुख यांनी म्हटले असून विद्यार्थ्यांनी अतिरिक्त भाषा म्हणून जपानी भाषेचे प्रशिक्षण घ्यावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.