ब्रेकिंग

घारगांव पोलीस ठाणे हद्दीत शेतकऱ्यांच्या शेतीवरील विद्युत पंपांची चोरी करणारे 03 आरोपी  जेरबंद

घारगांव पोलीस ठाणे हद्दीत शेतकऱ्यांच्या शेतीवरील विद्युत पंपांची चोरी करणारे 03 आरोपी  जेरबंद

अहिल्यानगर । प्रतिनिधी । दि. 16/02/2026 रोजी महेश गणपत हांडे वय 33 वर्षे रा. भोजदरी, ता. संगमनेर जि. अहिल्यानगर यांनी घारगांव पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली की, दि. 13/02/2026 रोजीचे 10-30 वा. ते दि. 14/02/2026 रोजीचे 06-30 वा. सुमारास त्याचे शेतातील मोटार पंप लावण्यात आलेला आहे. सदर मोटार पंप बंद करुन राहते घरी गेले असता व दुसऱ्या दिवशी पुन्हा मोटार पंप चालु करण्यासाठी शेता मध्ये आले होते. सदर वेळी त्यांना त्यांची मोटार पंप व त्याची कॉपरची केबल तसेच शेततळ्या मधील मोटार पंप व केबल मिळुन आली नाही. यावरुन त्यांची खात्री झाली की, त्याचे बोर मधील व शेतळ्यामधील मोटार पंप व केबल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. वगैरे मजकुरचे फिर्यादी वरुन घारगाव पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. 40/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा रजि. दाखल करण्यात आलेला आहे.

सदर गुन्ह्याचे तपासात असताना गोपणीय बातमीदारा मार्फत व तांत्रीक तपासावरुन माहिती प्राप्त झाली की, सदरचा गुन्हा 1) किशोर सुरेश काळे, वय 25 वर्षे, 2) सागर सुरेश काळे वय 23 वर्षे, 3) अनिल देमाभाऊ काळे, वय 27 वर्षे, सर्व रा. बाळंद्री, ता. संगमनेर जि. अहिल्यानगर यांना केला आहे. सदर गुन्ह्याचे तपासात वरील आरोपीतांना कैश्ल्याने ताब्यात घेवुन त्यांचेकडे विचारपुस केली असता त्यांनी घारगाव पोलीस ठाणे हद्दीत चोऱ्या केल्याचे कबुली दिली आहे. नमुद आरोपीतांकडे सखोल व बारकाईने तपास केला असता त्यांनी घारगांव पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. 24/2026, 14/2026, 22/2026, 23/2026 व अदखलपात्र गुन्हा रजि.नं. 664/2025, 12/2026, 25/2026, 96/2026, 97/2026, 98/2026, 99/2026 प्रमाणे दाखल गुन्हे केल्याचे सांगुन चोरी केलेला खालील प्रमाणे मुद्देमाल काढुन दिलेला आहे.

वरील गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करुन जप्त करण्यात आलेला आहे. सदरची कारवाई मा. श्री. सोमनाथ घार्गे साहेब, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, मा. श्री. सोमनाथ वाघचौरे, अपर पोलीस अधोक्षक, श्रीरामपूर, मा. श्री. कुणाल सोनवणे, उपविभागीय पोलीस अधिकारी, संगमनेर विभाग, संगमनेर यांचे मार्गदर्शना खाली सहा. पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, घारगांव पोलीस स्टेशन, यांचे पथक पोहेकॉ बी. वाय गोडे, पोकों प्रमोद गाडेकर, पोकों सुभाष बोडखे, पोकों सुरेश शेळके, पोकों अनिल भांगरे, पोकों महादेव हांडे, पोकों चांगदेव नेहे, चालक चंद्रकांत मेढे नेम. घारगांव पोलीस स्टेशन व पोहेकों सचिन धनाड अपर पोलीस अधीक्षक सो. कार्यालय श्रीरामपुर यांनी केली आहे. गुन्ह्याचा अधिक तपास चारगांव पोलीस ठाणे हे करीत आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!