थोरात सह.साखर कारखान्याच्या गळीत हंगामाची 25 फेब्रु.रोजी सांगता

थोरात सह.साखर कारखान्याच्या गळीत हंगामाची 25 फेब्रु.रोजी सांगता
संगमनेर । प्रतिनिधी । देशातील संपूर्ण सहकारासाठी मार्गदर्शक असलेल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन 2025 – 26 या गळीत हंगामाची सांगता बुधवार दिनांक 25 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 9 वा. काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात व मा.आ.डॉ. सुधीर तांबे यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती कारखान्याचे व्हा. चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी दिली आहे.

कारखान्याच्या गळीत हंगाम कार्यक्रमाबाबत अधिक माहिती देताना व्हा.चेअरमन पांडुरंग पा.घुले म्हणाले की, थोर स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श विचारांवर साखर कारखाना व सर्व सहकारी संस्थांची वाटचाल सुरू आहे. कमी ऊस आणि प्रतिकूल परिस्थिती असतानाही कारखान्याने सातत्याने चांगला भाव दिला आहे.सन 2025 – 26 या गळीत हंगामाची सांगता बुधवार दिनांक 25 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 9 वा. काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी महसूल व कृषिमंत्री बाळासाहेब थोरात व त्यांच्या सुविध्य पत्नी सौ.कांचनताई थोरात यांच्या हस्ते होणार आहेत. यावेळी मा.आ.डॉ.सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, सौ.दुर्गाताई तांबे, ॲड.माधवराव कानवडे, बाजीराव पा.खेमनर, रणजीतसिंह देशमुख, नगराध्यक्ष डॉ.मैथिलीताई तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात, सुधाकर जोशी, शंकरराव खेमनर, संपतराव डोंगरे, रामहरी कातोरे, हौशीराम सोनवणे, लक्ष्मणराव कुटे, उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख, राजेंद्र गुंजाळ, राजेंद्र कडलग, अजय फटांगरे, सोमेश्वर दिवटे, इंद्रजीत भाऊ थोरात, गणपतराव सांगळे, रामदास पा.वाघ,अर्चनाताई बालोडे, निखिल पापडेजा,शेखर सोसे,गौरव डोंगरे, हैदर अली,सुभाष सांगळे, घुलेवाडीच्या सरपंच सौ.निर्मला राऊत, यांच्यासह सर्व जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य नगरसेवक विविध संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तरी या गळीत हंगाम समारंभासाठी सर्व सभासद, ऊस उत्पादक पदाधिकारी नागरिक व बंधू – भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सर्व संचालक मंडळ व कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले आहे.



