लोणी येथे जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम

लोणी येथे जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम


लोणी येथे जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम
लोणी । प्रतिनिधी । जागतिक क्षयरोग (टीबी) दिनाच्या निमित्ताने कार्डिओरेस्पिरेटरी फिजिओथेरपी विभागातर्फे ग्रामपंचायत लोणी येथे टीबी प्रतिबंध, उपचार व पुनर्वसन याबाबत जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला असल्याची माहीती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचे प्राचार्य डॉ. आर. के. सिन्हा यांनी दिली.

या कार्यक्रमात अनेक ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या माहितीपूर्ण नाटकाद्वारे टीबीचे लवकर निदान, नियमित उपचार आणि प्रतिबंधात्मक उपायांचे महत्त्व प्रभावीपणे मांडले. तसेच, रुग्णांच्या पुनर्वसनात फिजिओथेरपीची महत्त्वपूर्ण भूमिका देखील अधोरेखित करण्यात आली. याशिवाय, विद्यार्थ्यांनी समाजामध्ये पल्मनरी रिहॅबिलिटेशनविषयक माहितीपुस्तिकांचे वितरण केले. या माहितीपुस्तिकांमध्ये फुफ्फुसांच्या आरोग्य सुधारण्यासाठी, श्वसन क्षमता वाढवण्यासाठी तसेच टीबी व इतर श्वसनविकारांच्या पुनर्वसनासाठी उपयुक्त अशा मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या. हा कार्यक्रम कार्डिओरेस्पिरेटरी फिजिओथेरपी विभागाच्या प्रमुख डॉ. सौमी सिन्हा यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढण्यास मदत झाली असून, निरोगी जीवनशैली अंगीकारण्यास प्रोत्साहन मिळाले.



