ब्रेकिंग

खेळातील सहभाग आणि खिलाडूवृत्ती यशाची गुरुकिल्ली – ध्रुव विखे पाटील

जाहिरात
खेळातील सहभाग आणि खिलाडूवृत्ती यशाची गुरुकिल्ली – ध्रुव विखे पाटील

खेळातील सहभाग आणि खिलाडूवृत्ती यशाची गुरुकिल्ली – ध्रुव विखे पाटील

लोणी । प्रतिनिधी । खेळात हार जीत होणे स्वाभाविक आहे, पण जिंकण्यापेक्षा खेळातील सहभाग आणि खिलाडूवृत्ती सर्वात महत्त्वाची असते. मैदानावरील खेळामुळे आपल्याला शिस्त लागते आणि संघात राहून काम करण्याची सवय होते, जी आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर उपयोगी पडत असल्याचे मत प्रवरा मेडीकल ट्रस्टचे सहसंचालक व विश्वस्त ध्रूव विखे पाटील यांनी व्यक्त केले.


प्रवरा इन्स्टिट्युट ऑफ मेडीकल सायन्सेस आणि प्रवरा मेडीकल ट्रस्ट अंतर्गत सर्व सेवकांच्या क्रिडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही.एन.मगरे, अधिष्ठाता डॉ. सतिश महाजन, डॉ. योगिंदर सिंग, क्रिडा संचालक डॉ. सुनिल बुलार आदी मान्यवर उपस्थित होते. सदरच्या स्पर्धेमध्ये क्रिकेट या क्रीडा प्रकारात ३५ संघ, व्हॉलीबॉल मध्ये २४ संघ, तर थ्रो बॉल मध्ये १४ संघांनी सहभाग घेतला. दोन दिवस डे नाईट प्रकाश झोतात सदरच्या स्पर्धा खेळविण्यात आल्या. यास्पर्धेत पुरूष गटात प्रवरा रूरल हॉस्पिटल नर्सिंग स्टाफ या संघाने क्रिकेटमध्ये विजेतेपद राखले तर प्रवरा अभिमत विद्यापीठाचा अकाउंट विभागाचा संघ उपविजेता ठरला. हॉलीबॉल स्पर्धेत प्रवरा रूरल हॉस्पिटल नर्सिगं स्टाफ विजेता संघ ठरला तर उपविजेते पद सुरक्षा विभागास मिळाले. महिल थ्रो बॉल स्पर्धेत आय.टी.विभाग प्रथम तर ग्रामीण दंत महाविद्यालयाचा संघ उपविजेता. महिला बॅडमिंटन एकेरी सामन्यामध्ये डॉ. रूचिता मुस्टिलवार विजेती तर उपविजेती डॉ. प्राजक्ता जोशी. तर पुरुष गटामध्ये बॅडमिंटन सिंगल शशि गणेश विजेते तर उपविजेते डॉ. सुनिल बुलार. बॅडमिंटन डबलमध्ये शशि गणेश व डॉ. सुनिल बुलार ह जोडी अजिंक्य तर डॉ. राजगोपाल व डॉ. रत्नाकर उपविजेते झाले. बॅडमिंटन महिला डबलमध्ये डॉ. तेजस बोरकर व डॉ. तनवी घुगे ही जोडी विजेते तर डॉ. रूचिता मुस्तीलवार व डॉ. सकिना यांना उपविजेते पदावर सामाधान मानावे लागले. डॉ. सुनिल बुलार यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले तर आभार प्रदर्शन केले तर नितिन गोर्डे यांनी आभार प्रदर्शन केले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!