ब्रेकिंग

के. बी. रोहमारे महाविद्यालयात “ब्रिज कोर्स” चे आयोजन

के. बी. रोहमारे महाविद्यालयात “ब्रिज कोर्स” चे आयोजन
oplus_0
जाहिरात
के. बी. रोहमारे महाविद्यालयात “ब्रिज कोर्स” चे आयोजन

कोपरगांव । प्रतिनिधी । जिल्ह्यातील अग्रगण्य व महाराष्ट्र शासनाच्या मूल्यांकनात अ+ हे सर्वोच्च मानांकन मिळवलेल्या के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी निःशुल्क ब्रिज कोर्सचे आयोजन दि. ०१ एप्रिल २०२६ सकाळी ०९:०० वाजे पासून करण्यात येत आहे. या निमित्ताने तालुक्यातील व जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी या सुवर्ण संधीचा आवर्जून लाभ घ्यावा असे आवाहन महाविद्यालयातर्फे करण्यात येत आहे.अकरावी व बारावी हे विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे वर्ष असतात. अकरावीची प्रवेश प्रक्रिया, दोन्ही वर्षात असणारे अभ्यासक्रम, या काळात येणाऱ्या संधी , विविध प्रवेश परीक्षा व स्पर्धा परीक्षा यांची यथायोग्य माहिती विद्यार्थ्यांना असणे अत्यंत गरजेचे असते. म्हणून प्रवेशाआधीच याबाबत विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले तर त्यांच्या पुढील अडचणी दूर होतात तसेच भविष्यातील धावपळ व चिंताही दूर होते. त्यामुळे अपेक्षित ध्येयनिश्चिती होते व शैक्षणिक प्रवास सुकर होतो. यासाठी हा कोर्स अत्यंत महत्त्वाचा आहे.महाविद्यालयात घेण्यात येणाऱ्या या कोर्समध्ये अकरावी व बारावी या दोन्ही वर्षांच्या अभ्यासक्रमाची पूर्वतयारी करून घेण्यात येणार आहे. तसेच विज्ञान शाखेतील JEE, NEET, MHT-CET, CLAT इत्यादी परीक्षांबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे CA, CS, PO तसेच पोलीस भरती ग्रामसेवक, तलाठी MPSC व UPSC या स्पर्धा परीक्षांबाबतही महत्त्वाचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे तसेच या परीक्षांची पूर्वतयारी करून घेण्यात येणार आहे.विशेष म्हणजे हा कोर्स पूर्णपणे निःशुल्क असल्याने व जागा मर्यादित असल्याने ऐनवेळी धावपळ होऊ नये म्हणून सर्वांनी लवकरात लवकर या कोर्ससाठी नोंदणी करावी असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय ठाणगे व उपप्राचार्य प्रा. बाळासाहेब सोनवणे यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक : 9822328814 7020663559 9850929303 (श्रीमती सुनिता बालवे) (श्री अभिजीत वाघ ) (डॉ. दीपक बुधवंत)

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!