ब्रेकिंग

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून सावरगाव घुले बेलसोंडा वस्तीचा पाणी प्रश्न मार्गी

वस्तीवरील महिलांनी मानले डॉ. जयश्रीताई थोरात यांचे आभार

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून सावरगाव घुले बेलसोंडा वस्तीचा पाणी प्रश्न मार्गी

 

वस्तीवरील महिलांनी मानले डॉ. जयश्रीताई थोरात यांचे आभार

संगमनेर । प्रतिनिधी । संगमनेर तालुक्यातील सर्व गावांमध्ये विकास कामांच्या योजना राबवण्याबरोबर पिण्याचा पाण्याचा प्रश्न लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने मार्गी लावला आहे. बेलसोंडा वस्तीवरील पाणीपुरवठा योजनेसाठी मदत करून या नागरिकांच्या पिण्याचा प्रश्न लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी सोडवला असून यामुळे नागरिकांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पठार भागातील सावरगाव घुले येथील बेलसोंडा वस्तीचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पाणीप्रश्न अखेर मार्गी लागण्याच्या दिशेने वाटचाल करत असून, ग्रामपंचायत, लोकसहभाग आणि लोकप्रतिनिधींच्या एकत्रित प्रयत्नांमुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. पाणीटंचाईच्या तीव्र पार्श्वभूमीवर या वस्तीला पाईपलाईनची अत्यंत गरज होती. ग्रामपंचायतीकडे काही निधी उपलब्ध असला तरी उर्वरित निधी उभारण्यासाठी लोकसहभागाची आवश्यकता भासत होती. याच अनुषंगाने वस्तीतील महिलांनी पुढाकार घेत युवक नेत्या डॉ  जयश्रीताई थोरात यांची भेट घेतली. “आमच्या वस्तीला पिण्याच्या पाण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी,” अशी भावनिक मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली. महिलांच्या या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेत डॉ. जयश्रीताईंनी तात्काळ प्रतिसाद देत पाईपलाईन कामासाठी मदत केली. त्यांच्या या तत्पर निर्णयामुळे रखडलेला पाणीप्रश्न सुटण्यास मोठी चालना मिळाली आहे.

लवकरच सावरगाव घुले ग्रामपंचायतीमार्फत पाईपलाईनची कामे सुरू करण्यात येणार असून, बेलसोंडा वस्तीतील प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचवण्याचा निर्धार करण्यात आला आहे. अनेक वर्षांपासून महिलांना डोक्यावर हंडे घेऊन लांब अंतरावरून पाणी आणावे लागत होते. मात्र आता ही कष्टप्रद परिस्थिती संपुष्टात येणार असल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.माजी सरपंच बाबाजी दगडू घुले यांनी सांगितले की, “महिलांच्या डोक्यावरील हंडा आता कायमचा उतरणार असून, हा आमच्यासाठी मोठा दिलासा आहे.” विशेष म्हणजे १९७२ पासून सुरू असलेली टँकर व्यवस्था लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यामुळे आता कायमची बंद होण्याच्या मार्गावर आहे, ही या भागासाठी ऐतिहासिक बाब ठरणार आहे.या उपक्रमासाठी सावरगाव घुले ग्रामपंचायत, माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि डॉ. जयश्रीताई थोरात यांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले. पठार भागातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी बाळासाहेब थोरात यांनी नेहमीच पुढाकार घेतला असून, त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत डॉ. जयश्रीताईंनीही तत्परतेने मदत करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. यावेळी बोटा गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे यांच्यासह रंजना घुले, अर्चना घुले, विद्या घुले, अलका घुले, शोभा घुले, चारुशीला घुले, जयश्री घुले, भिंबाई घुले, जनाबाई घुले, लता घुले, निर्मला घुले, वत्सला घुले यांसह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांनी डॉ. जयश्रीताई थोरात यांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली.

 

संगमनेर तालुका परिवार मानून विकास कामे

लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुका हा परिवार मानला आहे .कधीही भेदभाव केला नाही. राजकारण विरहित सर्वांना सोबत घेऊन तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी काम केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज ही पठार भागांमधील काही गावे आणि वाड्यावर राजहंस दूध संघाच्या टँकर मधून पिण्याचे पाणी पुरवले जात आहे. संगमनेर तालुका हा परिवार असून ही परंपरा आपल्याला जपायची असल्याचे डॉ. जयश्रीताई थोरात यांनी म्हटले आहे

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!