ब्रेकिंग
कोपरगाव शहर, व्यावसायिक व प्रवाशांची नेमकी गरज न ओळखता झालेले काम म्हणजे कोपरगाव बस स्थानक – आमदार आशुतोष काळे


कोपरगाव शहर, व्यावसायिक व प्रवाशांची नेमकी गरज न ओळखता झालेले काम म्हणजे कोपरगाव बस स्थानक – आमदार आशुतोष काळे


कोपरगाव बस डेपो परिसरात काँक्रिटीकरण कामाचा आमदार आशुतोष काळेंच्या हस्ते शुभारंभ
कोपरगांव । प्रतिनिधी । डॉक्टरला पेशंटची नस ओळखता आली तर उपचार व्यवस्थित होतात आणि लोकप्रतिनिधींना जर नागरिकांची गरज ओळखता आली तर विकास व्यवस्थित होतो.मात्र कोपरगाव बस स्थानक उभारतांना कोपरगाव शहराचा विचार केला गेला नाही. छोट्या मोठ्या व्यावसायिकांना व्यवसायाच्या संधी देता येतील याचा विचार करण्यात आला नाही व प्रवाशांना चांगल्या प्रकारे सोयी सुविधा कशा देता येतील हे अपेक्षित असतांना याचा कुठेही विचार करण्यात आला नाही. त्यामुळे कोपरगाव शहर, प्रवाशी व व्यावसायिक यांची नेमकी गरज न ओळखता झालेले काम म्हणजे कोपरगाव बसस्थानक असल्याची कडवट टीका आमदार आशुतोष काळे यांनी मा.आ.कोल्हे यांचेवर नाव न घेता केली आहे.

आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नांतून मिळालेल्या ०५ कोटी रुपयांच्या निधीतून महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत कोपरगाव बस डेपो परीसरातील काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी बोलतांना ते पुढे म्हणाले की, मला जनतेने सेवा करण्याची संधी दिल्यानंतर कोपरगाव शहराच्या नागरिकांच्या, प्रवाशांच्या आणि बस आगाराच्या अडचणी लक्षात घेऊन मी निधी आणला. त्या निधीतून दक्षिण बाजूने व्यापारी संकुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे तर उत्तरेच्या बाजूने नवीन बस डेपोचे काम सुरू आहे. यावरच न थांबता भविष्यात इलेक्ट्रिक बसेसची वाढती संख्या लक्षात घेऊन या बसेस चार्जिंगसाठी आवश्यक असणारे चार्जिंग स्टेशन देखील कोपरगाव बस स्थानकासाठी मंजूर करून आणले आहे. चार्जिंग स्टेशनच्या कामात देखील अनंत अडचणी आल्या मात्र अडचणींवर मात करून काम वेगाने पुढे जात असून चार्जिंग स्टेशन, काँक्रिटीकरण व बस डेपोसाठी २० कोटीपेक्षा जास्त निधी दिला. मात्र दुसरीकडे बस स्थानकाच्या परीसरातील खड्यातून जातांना माझ्या गाडीचा फोटो दाखवता मग हे पाप कुणाचे असा कडवट सवाल आमदार आशुतोष काळे यांनी मा.आ.कोल्हे यांचे नाव न घेता यावेळी विचारला.विकासाचे प्रश्न अडचणी अत्यंत असल्या तरी मला दिलेल्या संधीतून शक्य होईल तेवढ्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला आहे आणि यापुढेही करणार आहे.मूलभूत गरजा आणि प्रश्न भरपूर आहेत परंतु यापलिकडे जाऊन रोजगार उपलब्धतेसाठी प्रयत्न करीत आहे. कोपरगाव शहरात अधिकचा रोजगार उपलब्ध होऊन जास्तीत जास्त नागरिक वास्तव्यासाठी व नवीन उद्योग व्यवसाय कोपरगाव शहरात तेव्हा येतील जेव्हा आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर व्यवस्थित असेल तरच उद्योग व्यवसाय येतील आणि जास्तीत जास्त नागरिक येतील.त्यामुळे उद्योग व्यवसायासाठी अपेक्षित इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरीकांना कोपरगाव शहरात येण्यासाठी आवश्यक सोयी सुविधा कशा निर्माण करता येतील यासाठी प्रयत्न करीत आहे. व्यापारी संकुल काम पूर्ण होत असून अजून एक मजला वाढवून मिळावा अशी मागणी केली आहे.ती मागणी पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.त्यासाठी माझा पाठपुरावा सुरू आहे. दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी अडचणी येवू नये यासाठी लिफ्टचे प्रयोजन असून ते प्रत्यक्षात साकार होईल असा विश्वास आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी व्यक्त केला.यावेळी बस आगार व्यवस्थापक अमोल बनकर, बस स्थानक व्यवस्थापक अमित हम्पे, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, मनोहर कृष्णानी, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधाकर रोहोम, डॉ.चंद्रशेखर आव्हाड, सुरेश कातकडे, नगरसेवक मंदार पहाडे, हाजीमेहमूद सय्यद, राजेंद्र वाकचौरे, जनार्दन कदम, वाल्मिक लहिरे, विजय त्रिभुवन, इम्तियाज अत्तार, राहुल शिरसाठ, बाळासाहेब रुईकर, माजी नगरसेवक विरेन बोरावके, रमेश गवळी, फकीर कुरेशी, अजीज शेख, दिनकर खरे, शिवाजीराव खांडेकर, शिवाजीराव ठाकरे, चंद्रशेखर म्हस्के, सचिन परदेशी, जावेद शेख, डॉ. तुषार गलांडे, सचिन गवारे, मुकुंद भूतडा, सुनिल फंड, सागर आहेर, शुभम काळे, चंद्रकांत धोत्रे, अमित आगलावे, गणेश बोरुडे, शिवाजीराव कुऱ्हाडे, राजेंद्र जोशी, भाऊसाहेब भाबड, अंबादास वडांगळे, विकास बेंद्रे, प्रदीप कुऱ्हाडे, शुभम लासुरे, योगेश वाणी, राजेंद्र आभाळे, एकनाथ गंगुले, दिनेश संत, हारुण शेख, राजेंद्र फुलफगर, याकूब शेख, सुनिल गलांडे, तुकाराम काळे, सिद्धार्थ शेळके, बाळासाहेब बोर्डे, लहु सुपेकर, शुभम कानडे, नितेश बोरुडे, ठकाजी लासुरे, जुनेद शेख, संदिप सावतडकर, प्रथमेश वाकचौरे, मयूर राऊत, हर्षल कृष्णानी, राजेंद्र उशिरे, गणेश गोसावी, कैलास काळे, सुनिल वैरागळ, राजेंद्र पगारे, सोमाजी शिंदे, अविनाश शिंदे, संतोष दळवी, उमेश दीक्षित, प्रशांत मोरे, मयुरेश शिंदे, मंदार हिंगे, सुयोग ठोळे, रवींद्र राऊत, पप्पू देशमुख, तुषार साठे, संतोष बारसे, अभियंता बायजित पठाण, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अधिकारी,कर्मचारी आदी उपस्थित होते.



