तब्बल ५५ लाख रूपयेचा अवैध डिझेल वाहतूक करणारा टँकर जप्त
अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कारवाई

तब्बल ५५ लाख रूपयेचा अवैध डिझेल वाहतूक करणारा टँकर जप्त


अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कारवाई
कोपरगांव । प्रतिनिधी । दिनांक ३० एप्रिल २०२६ रोजी पो.नी किरणकुमार कबाडी, स्था. गु. शा. अहिल्यानगर यांचे आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी पोउपनि दिपक मेढे पोलीस अंमलदार विजय पवार, राहुल द्वारके, प्रकाश मांडगे, सुनिल मालणकर, प्रशांत राठोड चालक अरुण मोरे अशांचे पथक कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्याची माहीती काढुन कारवाई करणे कामी पेट्रोलींग करीत असतांना पो.नि. किरणकुमार कबाडी यांना गुप्त बातमीदारामार्फत, टँकर नंबर एम.एच.४३ बी.पी. ५०८५ मध्ये अवैधरित्या पेट्रोल पंपावरुन डिझेल भरुन सुरजगड जि. गडचिरोली येथील खाणीमध्ये विक्री करण्यासाठी जाणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने, त्यांनी वरील पथकास बातमीतील हकिकत कळवुन खात्री करुन कायदेशीर कारवाई करणे बाबत सुचना दिल्या.
वरील सुचने प्रमाणे नमुद पथकाने तात्काळ समृध्दी महामार्ग पोल नं.५२० येथे जावुन सापळा रचुन थांबले असता बातमीतील नमुद टँकर येतांना दिसुन आल्याने पथकाने सदर टँकर ताब्यात घेवुन पुरवठा अधिकारी श्री कोपसे यांचे समक्ष टँकरवरील चालकास त्याचे नांव गाव विचारले असता त्यानी महादेव वचिष्ट डांगे वय- ५० वर्षे रा. शिवाजीनगर, नेरुळ नवी मुंबई, मुळ रा. पिंपळवाडी, ता.बार्शी जि. सोलापुर असे असल्याचे सांगितले. त्यास विश्वासात घेवुन सदर टँकरमध्ये भरलेले डिझेल कोठुन व कोणाचे सांगणे वरुन भरलेले आहे याबाबत विचारपुस करता त्याने सांगितले की, मोबाईल नंबर ८२०८७०३००७ (फरार) यावरुन डिझेल भरण्यासाठी चे लोकेशन, प्रतीक सानप(पुर्ण नांव माहिती नाही) (फरार) यास आले त्यानंतर प्रतीक सानप यांनी तो लोकेशन मला पाठविले त्याप्रमाणे प्रमोद हरणे (पुर्ण नांव माहित नाही) (फरार) यांचे सांगणे वरुन साई प्रसाद पेट्रोल पंप, स्टेट हायवे ४४ वरील हिंदुस्थान पेट्रोल पंप व शहापुर खर्डी रोडवरील हिदुस्थान पेट्रोल पंपावरु डिझेल भरुन ते सुरजागड जि.गडचिरोली येथे घेवुन जात असले बाबत कळविले आहे.त्यानंतर पथकाने इसमाच्या ताब्यातुन २५,००,०००/-रुपये कि.ची एक टँकर एम.एच.४३ बी.पी. ५०८५ असा असलेला, ३०,८७,८४०/- रु.कि.ची ३४,००० लिटर डिझेल असा एकुण ५५,८७,८४०/- रुपये किंमतीची मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.ताब्यात घेतलेल्या आरोपींनी शासनाचा कोणत्याही प्रकारचा करारनामा व परवाना न घेता, बेकायदेशिर व अवैधरित्या वेगवेगळ्या पेट्रोल पंपावरुन डिझेल टँकरमध्ये भरुन ज्वलनशिल पदार्थाबाबत पुरेशी काळजी न घेता स्वत:चे व इतरांचे जिवीतास धोका होईल अशा धोकादायक पध्दतीने विक्री करण्याकरीता घेवुन जात असतांना मिळुन आला आहे ताब्यातील आरोपी विरुध्द कोपरगाव शहर पो.स्टे. गु.र.नं. २२५/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम १२५ ,२२३,२८७, सह जीवनावश्यक वस्तु कायदा १९५५ चे कलम ३,७, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस स्टेशन करीत आहे. सदरची कारवाई सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.


