ब्रेकिंग
एआय तंत्रज्ञानाचा वापर करून उसाची उत्पादकता वाढवा – माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात

थोरात कारखान्याच्या वतीने कृत्रिम बुद्धिमत्ता व ऊस शेती याबाबत मेळावा संपन्न
संगमनेर । प्रतिनिधी । ऊस व दूध हे शाश्वत उत्पादन देणारे आहे. थोरात कारखान्याने कायम चांगला भाव दिला असून कार्यक्षेत्रामध्ये ऊस क्षेत्रवाढी बरोबर एकरी उत्पादन वाढले पाहिजे. नवीन एआय तंत्रज्ञानाचा वापर करू पिकांवरील समस्या व त्यावर उपाय करणे लवकर शक्य होणार आहे या तंत्रज्ञानाचा वापर करून उसाचे क्षेत्र व उत्पादकता वाढली पाहिजे यासाठी काम करावे असे आवाहन काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य माजी कृषीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

खांडगाव येथे कारखान्याच्या खांडेश्वर ऊस बेणे प्लॉट येथे कृत्रिम बुद्धिमत्ता व ऊस शेती याचबरोबर ऊस विकास मेळावा कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले, ॲड माधवराव कानवडे, राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष बाबा ओहोळ, संपतराव डोंगरे ,लहान भाऊ गुंजाळ, इंद्रजीत भाऊ थोरात, रामहरी कातोरे ,रामदास वाघ, सभापती शंकरराव खेमनर, वसंतदादा शुगरचे शास्त्रज्ञ डॉ अशोक कडलग, बारामतीचे तुषार पोळ, नितीन शिंदे, परिमल गिरी, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांच्यासह परिसरातील कार्यकर्ते शेतकरी व ऊस उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना मा कृषिमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, ऊस आणि दूध हे शेतकऱ्यांना शाश्वत उत्पादन देणारे आहे. शेती ही परवडणारी झाली पाहिजे याकरता उत्पादकता वाढवणे अत्यंत गरजेचे आहे. नवीन एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पिकांवरील समस्या आणि त्यावर करावयाचे उपाय याची तातडीने माहिती मिळत आहे त्यामुळे प्रभावी उपाययोजना लवकर करणे शक्य आहे. ठिबक सिंचन , एआय या प्रणालींचा वापर आपल्याला करावा लागणार आहे.दुष्काळी भागाला वरदान ठरणारी निळवंडे धरण व कालवे आपण पूर्ण केले या दोन्ही कालव्यांमधून आता पाणी आले आहे त्या माध्यमातून उसाचे क्षेत्र वाढविले पाहिजे. कमी श्रमात जास्त उत्पादन हे सूत्र राबवताना शेती परवडणारी झाली पाहिजे. म्हणून शेती व्यवसाय म्हणून करा. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करा.

केंद्र सरकारने सहकारी साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मिती करण्यास सांगितले मात्र आता ते इथेनॉल घेत नाहीत इथेनॉल घेणे ही त्यांची जबाबदारी आहे. मागील काही दिवसांमध्ये सरकारने देशातील साखर निर्यात केली आणि आता 10 लाख टन साखर आयात केली आहे. निर्णयांमध्ये गोंधळ अशी परिस्थिती केंद्र सरकारची आहे आणि याचा तोटा सर्वसामान्य माणूस व शेतकऱ्यांना होत आहे.कोणत्याही शेतकऱ्यांना ऊस लागवड करायची झाल्यास त्यांनी तीन महिने अगोदर कारखान्याला कळवल्यानंतर त्या शेतीचे आरोग्य कार्ड तयार केले जाते याचबरोबर उसाची उत्पादकता व क्षेत्र वाढल्याने कारखान्याचे कार्यक्षेत्रातील गाळप वाढणार आहे याचा फायदा थेट शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्यासाठी होणार आहे. या माध्यमातून वीज निर्मिती इथेनॉल उपपदार्थ निर्मितीमुळे शेतकऱ्यांना अधिक लाभ देता येईल असे ते म्हणाले.तर डॉ अशोक कडलग म्हणाले की, शेतीच्या समस्या लवकरात लवकर माहीत होऊन त्यावर त्वरित उपाय करण्यासाठी हे आहे तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे शेतीतील उत्पादकता वाढवण्यासाठी सेंद्रिय कर्ब वाढवावा लागेल यासाठी शेतकऱ्यांनी पाचटाचा खत म्हणून जास्त वापर करावा पाणी कमी वापरा माती परीक्षण करा असे त्यांनी सांगितले तर नितीन शिंदे म्हणाले की एआई तंत्रज्ञानामुळे तापमान आद्रता वाऱ्याचा वेग हवामान अंदाज शेतकऱ्यांना सहज कळतो.यावेळी विविध शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना शास्त्रज्ञांनी उत्तरे दिली. याप्रसंगी संचालक संपतराव गोडगे, गुलाबराव देशमुख ,विजय राहणे ,रामनाथ कुटे, विलास शिंदे, सतीश वर्पे ,अरुण वाकचौरे, रामदास धुळगंड ,योगेश भालेराव, विनोद हासे,रमेश गुंजाळ, सौ लताताई गायकर, सौ मीराताई शेटे ,सुरेश थोरात, नाना वाघ, प्राचार्य ठाकाजी कानवडे, दिलीप खरात ,अंकुश ताजने , संभाजी वाकचौरे ,मदन आंब्रे ,प्रमोद पावसे, कृषी अधिकारी भाऊसाहेब खर्डे, सेक्रेटरी किरण कानवडे, कृष्णा दिघे, ऊस विकास अधिकारी बाळासाहेब सोनवणे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले तर व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी आभार मानले यावेळी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ए आय तंत्रज्ञान वापराच्या 25 शेतकऱ्यांचा गटसहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने संगमनेर तालुक्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता अंतर्गत ऊस विकास वाढ व्हावी याकरता 25 शेतकऱ्यांच्या शेतावर प्रयोग राबविण्यात आला आहे. दररोज हवामानातील होणारे बदल. संभाव्य येणारी कीड पाण्याची उपलब्धता याबाबतचे माहिती शेतकऱ्यांना मिळत असून या सर्व पंचवीस शेतकऱ्यांचा एक स्वतंत्र प्रयोग तत्त्वावर गट तयार करण्यात आला आहे. नवीन तंत्रज्ञानाचा हा वापर परवडणारी शेती करणारा करेल असा विश्वास माजी कृषी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला तर या गट शेती मधून इतरांना प्रोत्साहन मिळेल असेही ते म्हणाले.