ब्रेकिंग

मा. मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून ग्रामीण रुग्णालयाचे विस्तारीकरण

मा. मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून ग्रामीण रुग्णालयाचे विस्तारीकरण

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात 100 बेडची विस्तारित इमारत
संगमनेर । प्रतिनिधी । संगमनेर तालुक्यातील नागरिकांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळावा याकरता तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयामध्ये 100 बेडची अत्याधुनिक इमारत उभी 2022 मध्ये प्रशासकीय मंजुरी मिळालेली आहे. त्या माध्यमातून व त्यांच्या पाठपुराव्यातून घुलेवाडी इमारतीचे काम सुरू असल्याचे जिल्हा परिषद सदस्य सिताराम राऊत यांनी म्हटले आहे.

याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात सिताराम राऊत यांनी म्हटले आहे की लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्यातील नागरिकांना आरोग्याच्या अत्याधुनिक दर्जेदार सुविधा मिळावा याकरता आपल्या महसूल मंत्री पदाच्या काळामध्ये घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयामध्ये 100 बेडचे नवीन रुग्णालय मंजूर केले याकरता 13 ऑगस्ट 2022 मध्ये या कामाला महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात प्रशासकीय मान्यता मिळवली होती. त्यानंतर आमदार सत्यजित तांबे यांनीही  हे रुग्णालय अत्यंत उत्कृष्ट दर्जाचे होण्यासाठी सातत्याने राज्य सरकारकडे पाठपुरावा केला. त्या माध्यमातून हे रुग्णालय उभे राहत आहे.घुलेवाडी ग्रामस्थांनी ग्रामीण रुग्णालयासाठी ही जागा उपलब्ध करून दिली तेव्हा या ठिकाणी अद्यावत रुग्णालय व्हावे अशी मागणी केली होती. त्याच वेळेला भविष्यात या ठिकाणी आपण जिल्हा रुग्णालय करू असे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ग्रामीण रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी दिले होते .व तदनंतर 2022 मध्ये या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयाला त्यांनी पाठपुरावा करून मान्यता दिली.संगमनेर शहरामध्ये महिलांसाठी स्वतंत्र हॉस्पिटल व्हावे. याकरता लोकनेते बाळासाहेब थोरात यांनीच पाठपुरावा केला आहे. 2020 मध्ये या कामालाही मंजुरी मिळाली होती. घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाचा चेहरा मोहरा बदलताना या ठिकाणी प्रशस्त जागेवर नवीन 100 बेडचे अत्याधुनिक रुग्णालय उभे करण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला आहे. या प्रशासकीय मान्यता मिळवण्यामध्ये नवीन लोकप्रतिनिधीच्या कोणताही संबंध  नाही.त्याचबरोबर पावसाळी अधिवेशनामध्ये आमदार सत्यजित तांबे यांनी घुलेवाडी व साकुर ग्रामीण रुग्णालयातील सुविधांबाबत विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला होता मीयानंतर आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांनी हे काम प्रगतीपथावर असून आमदार तांबे यांच्या सूचनेतून चांगले रुग्णालय, डॉक्टर नर्स व प्रशिक्षित सर्व स्टाफ दिला जाईल असे सांगितले होते. या इमारतीचे काम लवकरात लवकर होऊन नागरिकांना उत्कृष्ट व दर्जेदार आरोग्याच्या सुविधा मिळाव्या ही सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. असे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सिताराम राऊत यांनी म्हटले आहे..

नवी इमारत घुलेवाडीच्या वैभववात भर टाकणार

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयांमध्ये 100 बेड साठी मंजुरी मिळाली असून नवीन अत्याधुनिक रुग्णालय उभे राहत असून प्रशस्त व अद्यावत कोर्टाच्या इमारतीप्रमाणे नवी इमारत घुलेवाडी गावच्या वैभवात भर टाकणार आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण होऊन नागरिकांना चांगल्या आरोग्याच्या सुविधा मिळतील असा विश्वास सरपंच सौ निर्मलाताई राऊत यांनी व्यक्त केला आहे

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!