ब्रेकिंग
कोपरगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई द्या – कैलास रहाणे

कोपरगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई द्या – कैलास रहाणे


कोपरगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई द्या – कैलास रहाणे
कोपरगांव । प्रतिनिधी । कोपरगाव तालुक्यात गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. पावसाअभावी उभी पिके करपू लागली असून तालुक्यातील अनेक भागांत सुमारे ८० टक्क्यांपर्यंत पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे कोपरगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
“पावसाअभावी शेतकऱ्यांची पिके हातची गेली आहेत. शासनाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कोपरगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा. पीक विमाधारकांना १०० टक्के नुकसानभरपाई आणि विमा न भरलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये सरसकट मदत द्यावी.”— कैलास रहाणेमाजी भाजप तालुकाध्यक्ष, कोपरगाव
याबाबत आज शेतकऱ्यांच्या वतीने कोपरगाव तहसीलदार तसेच जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. पावसाअभावी हातातोंडाशी आलेली खरीप पिके वाया जाण्याची परिस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्यामुळे शासनाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने सरसकट मदत जाहीर करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे, त्यांना १०० टक्के नुकसानभरपाई मिळावी. तसेच ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला नाही, अशा शेतकऱ्यांना शासनाने हेक्टरी ५० हजार रुपये सरसकट अनुदान द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.पावसाअभावी सोयाबीन, मका, बाजरी, कापूस यांसह विविध खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतीसाठी केलेला बियाणे, खते, औषधे व मशागतीचा खर्चही वसूल होण्याची शक्यता कमी झाली आहे. त्यामुळे शासनाने विलंब न करता कोपरगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांसाठी सरसकट नुकसानभरपाईची घोषणा करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.या मागणीसाठी शेतकरी कैलास रहाणे, भगवान ठोंबरे, आप्पासाहेब रहाणे, निलेश गुडघे, विकास गोरडे, सुभाष गोरडे आदींनी निवेदन देत प्रशासनाचे लक्ष शेतकऱ्यांच्या गंभीर परिस्थितीकडे वेधले.


