ब्रेकिंग

जवळके धोंडेवाडीच्या ‘भावड्या वडेवाल्यां’ची ४० वर्षांची चवदार परंपरा!

जवळके धोंडेवाडीच्या ‘भावड्या वडेवाल्यां’ची ४० वर्षांची चवदार परंपरा!

वडिलांनी सुरू केलेला व्यवसाय मुलांनी जपला; चविष्ट वडा अन् दर्जेदार चहा आस्वाद घेण्यासाठी खवय्यांची गर्दी

कोपरगाव । विनोद जवरे । जवळके धोंडेवाडी म्हटलं की अनेकांच्या डोळ्यासमोर येते ती म्हणजे ‘भावड्या वडेवाले’ यांची चविष्ट वड्यांची ओळख! गेल्या तब्बल ४० वर्षांपासून वडे व्यवसायाची परंपरा जपत दरेकर कुटुंबाने आपल्या चवीची आणि दर्जाची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. वडिलांनी सुरू केलेल्या या व्यवसायाची धुरा आता त्यांची पुढील पिढी समर्थपणे सांभाळत असून, देविदास दरेकर आणि गणेश दरेकर हे दोन्ही भाऊ मिळून हा व्यवसाय यशस्वीपणे पुढे नेत आहेत.


जवळके धोंडेवाडी परिसरात देविदास उर्फ भावड्या वडेवाले म्हणून ओळख असलेल्या दरेकर कुटुंबाचा हा व्यवसाय केवळ उपजीविकेचे साधन नसून, चार दशकांपासून ग्राहकांच्या विश्वासाशी जोडलेली एक चवदार परंपरा बनली आहे. त्यांच्या वड्यांची चव, उत्तम गुणवत्ता आणि ग्राहकांशी असलेले जिव्हाळ्याचे नाते यामुळे परिसरातील नागरिकांसह दूरवरून येणाऱ्या खवय्यांमध्येही त्यांची विशेष ओळख निर्माण झाली आहे.

वडिलांची परंपरा मुलांनी जपली…

सुमारे ४० वर्षांपूर्वी दरेकर कुटुंबातील वडिलांनी सुरू केलेल्या या व्यवसायाने काळाच्या ओघात अनेक बदल अनुभवले. मात्र, वड्यांची चव, दर्जा आणि ग्राहकांचे समाधान यांना केंद्रस्थानी ठेवत व्यवसायाची वाटचाल सुरू राहिली. आता देविदास दरेकर आणि गणेश दरेकर हे दोन्ही भाऊ एकत्रितपणे व्यवसाय सांभाळत आहेत.व्यवसायात सातत्य, मेहनत आणि ग्राहकांच्या पसंतीला महत्त्व देत त्यांनी वडिलांकडून मिळालेली ही परंपरा आजही टिकवून ठेवली आहे. त्यामुळे ‘भावड्या वडेवाले’ हे नाव परिसरातील खाद्यप्रेमींसाठी विश्वासाचे नाव बनले आहे.चविष्ट वड्यासोबदरेकर यांच्या वड्यांची खासियत म्हणजे त्यांची चव आणि गुणवत्ता. चविष्ट वडा खाण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना त्यासोबत गरमागरम चहा, दर्जेदार कॉफी आणि मिसळीचाही आस्वाद घेता येतो. वड्यासोबत चहाचा आनंद घेण्यासाठी येथे ग्राहकांची मोठी गर्दी होत असल्याचे दिसून येते.सकाळपासून विविध वेळेत येथे येणारे ग्राहक वड्यांचा आस्वाद घेत चहाच्या कपासोबत गप्पांचा आनंद लुटतात. परिसरातील नागरिक, प्रवासी तसेच खाद्यप्रेमींसाठी हे ठिकाण एक परिचित आणि आवडीचे ठिकाण बनले आहे.शिर्डीच्या दिशेने मुंबईहून पायी पालखीने प्रवास करणाऱ्या साईभक्तांसाठीही जवळके धोंडेवाडी येथील ‘भावड्या वडेवाले’ हे एक आकर्षण ठरते. लांबचा पायी प्रवास करताना विश्रांतीसाठी थांबणारे साईभक्त येथे वड्यांचा आस्वाद घेतात. वड्यासोबत मिळणारा चहा आणि इतर खाद्यपदार्थ त्यांच्या प्रवासातील थकवा काही काळ दूर करण्यासाठी आनंदाचा क्षण देतात.


साईभक्त, प्रवासी आणि स्थानिक ग्राहक यांच्याशी जोडलेले हे नाते व्यवसायाच्या विश्वासार्हतेची साक्ष देते. अनेक वर्षांपासून चांगली चव आणि दर्जा जपल्यामुळे दरेकर कुटुंबाच्या व्यवसायाला ग्राहकांचे प्रेम मिळत आहे.

चव, गुणवत्ता आणि विश्वासाची ४० वर्षांची वाटचाल

आजच्या स्पर्धेच्या युगात खाद्य व्यवसायात सातत्याने दर्जा टिकवणे हे मोठे आव्हान आहे. मात्र, दरेकर कुटुंबाने आपल्या व्यवसायात चव आणि गुणवत्ता यांना महत्त्व देत चार दशकांचा प्रवास पूर्ण केला आहे. वडिलांनी लावलेले व्यवसायाचे रोपटे आता दोन्ही भावांच्या मेहनतीने विस्तारत आहे.देविदास दरेकर आणि गणेश दरेकर या दोन्ही भावांची मेहनत, ग्राहकांशी असलेले आपुलकीचे नाते आणि वडिलांकडून मिळालेली व्यावसायिक शिकवण यामुळे ‘भावड्या वडेवाले’ ही ओळख आजही टिकून आहे. जवळके धोंडेवाडीच्या मातीतून उभी राहिलेली ही ४० वर्षांची चवदार परंपरा स्थानिक व्यवसायाच्या जिद्दीची आणि कुटुंबाच्या मेहनतीची प्रेरणादायी कहाणी सांगते.

वड्यांच्या चवीतून उभा राहिला ४० वर्षांचा विश्वास!
जवळके धोंडेवाडी येथील देविदास उर्फ भावड्या वडेवाले यांच्या कुटुंबाने चार दशकांपासून वडे व्यवसायाची परंपरा जपली आहे. देविदास दरेकर आणि गणेश दरेकर हे दोन्ही भाऊ आज व्यवसायाची धुरा सांभाळत असून, चविष्ट वडा, चहा, कॉफी आणि मिसळीमुळे ग्राहकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते कायम आहे.

“दरेकर यांच्या वड्याची चव म्हणजेच जवळकेची खास ओळख!”

गेल्या ४० वर्षांपासून वड्याच्या व्यवसायातून ग्राहकांच्या मनात विश्वास निर्माण करणाऱ्या दरेकर कुटुंबाच्या वड्याला ग्राहकांची आजही मोठी पसंती आहे. चव, गुणवत्ता आणि आपुलकीच्या सेवेमुळे जुन्या ग्राहकांसह नव्या पिढीतील ग्राहकही आवर्जून दरेकर यांचा वडा चाखण्यासाठी येतात. चव अशी की, एकदा खाल्ला की पुन्हा पुन्हा खावासा वाटतो! – सचिन वाकचौरे

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!