ब्रेकिंग

अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची सकारात्मक भूमिका

अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची सकारात्मक भूमिका


अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची सकारात्मक भूमिका

संगमनेर ।  प्रतिनिधी । अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज संगमनेर येथे जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांचे प्रमुख नेते, लोकप्रतिनिधी आणि सहकार क्षेत्रातील मान्यवरांची बैठक पार पडली.जिल्ह्यात सध्या निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती, शेतकरी व सहकार क्षेत्रासमोरील आव्हाने तसेच अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आजवर जपलेली सहकाराची आणि राजकारणविरहित वाटचाल लक्षात घेता, बँकेची निवडणूक टाळून ती बिनविरोध करण्यासाठी सर्वांनी सकारात्मक प्रयत्न करावेत, अशी भूमिका बैठकीत एकमताने व्यक्त करण्यात आली.

अहिल्यानगर जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा यापूर्वीही जिल्ह्यातील समविचारी मंडळींनी अनेकवेळा जपली आहे. त्याच परंपरेला पुढे नेत, राजकीय मतभेद बाजूला ठेवून जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राच्या व्यापक हितासाठी सर्वांनी एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्ह्यातील शेतकरी, सहकारी संस्था आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. त्यामुळे निवडणुकीच्या माध्यमातून निर्माण होणारी अनावश्यक राजकीय स्पर्धा टाळून बँकेचे कामकाज अधिक सक्षम, पारदर्शक आणि प्रभावीपणे पुढे न्यावे, तसेच बँकेची प्रगती आणि जिल्ह्यातील सहकार क्षेत्राची भक्कम वाटचाल कायम राहावी, या सकारात्मक हेतूने निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करण्याचे बैठकीत ठरविण्यात आले.या बैठकीस माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री शंकरराव गडाख, माजी खासदार डॉ.सुजय विखे पाटील, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार आशुतोष काळे, आमदार संग्राम जगताप, आमदार हेमंत ओगले, आमदार विवेक कोल्हे, आमदार विक्रम पाचपुते, आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार काशिनाथ दाते, आमदार अक्षय कर्डिले, श्रीरामपूरचे नगराध्यक्ष करण ससाने आणि श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे, ज्येष्ठ नेते भगवानराव पाचपुते, प्रतापसिंह पाचपुते उपस्थित होते.आमदार मोनिका राजळे आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर घुले यांनी बैठकीस ऑनलाइन माध्यमातून उपस्थित राहून या सकारात्मक भूमिकेला पाठिंबा दर्शविला.जी नेतेमंडळी आपल्या व्यस्त कार्यक्रमांमुळे आजच्या बैठकीला उपस्थित राहू शकले नाही, तसेच ज्यांच्यासोबत संपर्क झाला नाही, त्या सर्वांशी समन्वय साधून त्यांना या भूमिकेसोबत घेण्याचा प्रयत्न राहील.जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राच्या व्यापक हितासाठी सर्व समविचारी मंडळींनी एकत्र येऊन अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सकारात्मक आणि सामंजस्यपूर्ण वातावरण निर्माण करावे, हीच बैठकीची सामूहिक भूमिका आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!