ब्रेकिंग

गौतम पॉलीटेक्निक इन्स्टिट्यूटच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

गौतम पॉलीटेक्निक इन्स्टिट्यूटच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

कोपरगांव । प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्यात तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२५ पदविका अभियांत्रिकी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम पॉलीटेक्निक इन्स्टिट्यूटच्या सर्वच विभागांचा निकाल नुकताच जाहीर झाला असून गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी याही वर्षी उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवत महाविद्यालयाचा शेकडा निकाल एकूण ९६%  एवढा लागला आहे. महाविद्यालयात  कु. भाकरे हर्षदा बाबासाहेब ही ९२.४७ % गुण मिळवून प्रथम,  बहिरट अखिलेश दगेश ९२.२४ % गुण मिळवून द्वितीय तर कु. चांदगुडे ईश्वरी विकास हिने ९०.४७ % गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला असल्याची माहिती प्राचार्य सुभाष भारती यांनी दिली आहे.

महाविद्यालयाच्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी करत प्रथम वर्षाचा एकूण शेकडा निकाल देखील ९६% एवढा लागला असून प्रथम क्रमांक कु. होन दीपिका श्रीकांत ८५.४१%द्वितीय क्रमांक कु. अबक प्रतीक्षा अनिल ८३.६५%तर कु.मोकळ सायली किरण ८१.०६% मिळवत तृतीय क्रमांक मिळविला आहे.द्वितीय वर्षाचा शेकडा निकाल एकूण ९८ % एवढा लागला असून यामध्ये मेकॅनिकल विभागात प्रथम क्रमांक कु. भोसले दीक्षा राजेंद्र ७७.६७ %द्वितीय वहाडणे ओमप्रकाश महेश ७४.२२ %तृतीय आहेर सहर्ष सतीष ७३.६७द्वितीय वर्ष इलेक्ट्रिकल विभागात प्रथम क्रमांक मुरडणर अरुण नवनाथ ७६.४७ %द्वितीय क्रमांक डोलणार राहुल दत्तू ७४.२५%तृतीय क्रमांक कु. गवांदे पूजा सोमनाथ ७३.८८%द्वितीय वर्ष कॉम्प्युटर विभागात प्रथम क्रमांक कु. गोरे सृष्टी गोपीनाथ ८८%द्वितीय क्रमांक कु.घारे अपूर्वा दत्तात्रय ८७.७७%तर कु.जावळे ज्ञानेश्वरी माणिक हिने ८६.९४%तृतीय क्रमांक मिळविला आहे. द्वितीय वर्ष सिव्हिल विभागात प्रथम क्रमांक जाधव यशराज नरेंद्र ७६.५६%द्वितीय क्रमांक थोरात राहुल नवनाथ ७५.३३%तर कुंभार्डे प्रथमेश संजय ७५ % गुण मिळवित तृतीय क्रमांक मिळविला आहे.तृतीय वर्षाचा शेकडा निकाल एकूण ९८% एवढा लागला असून यामध्ये तृतीय वर्ष मेकॅनिकल विभागात प्रथम क्रमांक कु. घोडेराव श्रावणी भीमराव ८२.२२%द्वितीय क्रमांक कु. घोडेराव प्रियांका नाना ७६.३१%तृतीय क्रमांक एरंडे तेजस अनिल ७६.२२%तृतीय वर्ष इलेक्ट्रिकल विभागात प्रथम क्रमांक आढाव तुषार नामदेव ८३%द्वितीय क्रमांक जोरे यश संजय ८२.७५%तृतीय क्रमांक सय्यद उमर निसार ७६.२५%तृतीय वर्ष कॉम्प्युटर विभागात प्रथम क्रमांक कु.भाकरे हर्षदा बाबासाहेब ९२.४७ %द्वितीय क्रमांक बहिरट अखिलेश दगेश ९२.२४%तृतीय क्रमांक कु.चांदगुडे ईश्वरी विकास ९०.४७%सिव्हिल विभागात प्रथम क्रमांक कु. कांगणे पूजा सोमनाथ ८२ % द्वितीय क्रमांक कुबरसे साक्षी शांतीलाल ७९.४४%तृतीय क्रमांक जाधव शुभम बाबासाहेब ७९% गुण मिळविले आहे. तृतीय वर्ष ऑटोमोबाईल विभागात प्रथम क्रमांक आवारे कुणाल किरण ८४.४४%द्वितीय क्रमांक जाधव चेतन ज्ञानेश्वर ७७.५६%तृतीय क्रमांक चिने चैतन्य बाबासाहेब ७५% गुण मिळविले आहेत.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा.आ. अशोकराव काळेसंस्थेचे विश्वस्त आ. आशुतोष काळेव्हा. चेअरमन छबुराव आव्हाडमानद सचिव सौ. चैतालीताई काळेसहसचिव सौ. स्नेहलताताई शिंदेतसेच सर्व गव्हर्निंग कौन्सिल सदस्यसंस्थेचे इनस्पेक्टर प्रा.नारायण बारेप्राचार्य सुभाष भारती,कार्यालयीनअधीक्षक आण्णासाहेब बढे व सर्व प्राध्यापक-प्राध्यापिकाशिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!