ब्रेकिंग

सोमैया महाविद्यालयात मोडी लिपी प्रारंभिक प्रशिक्षण वर्ग उत्साहात

सोमैया महाविद्यालयात मोडी लिपी प्रारंभिक प्रशिक्षण वर्ग उत्साहात

कोपरगाव । प्रतिनिधी । इतिहास विभाग के.जे.सोमैया महाविद्यालय कोपरगाव, आणि ‘वसुंधरा’ भाषा मोडी लिपी संवर्धन, संशोधन केंद्र, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ०२/०२/२०२६ ते ०७/०२/२०२६ या कालावधीमध्ये मा. प्रा. महेश जोशी यांच्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनात मोडी लिपी प्रारंभिक प्रशिक्षण वर्ग उत्साहात संपन्न झाला अशी माहिती प्रा. डॉ. विजय ठाणगे यांनी दिली.
जाहिरात मो -7756045359
 या संदर्भात अधिक माहिती देताना डॉ. ठाणगे पुढे म्हणाले की, “इतिहास आणि सामाजिक शास्त्रात उच्च शिक्षण घेणाऱ्या तसेच भविष्यात संशोधन करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सैद्धांतिक अभ्यासाबरोबरच प्रात्यक्षिके  देखील महत्त्वाची असतात. याच उद्देशाने ‘मोडी लिपी प्रशिक्षण वर्ग’ हा उपक्रम दरवर्षी राबविण्यात येतो. यासाठी पुणे येथील वसुंधरा भाषा मोडी लिपी संवर्धन संशोधन  केंद्र, पुणे येथील मोडी लिपी तज्ञ प्रा. महेश जोशी यांना निमंत्रित केले जाते. यंदाही इतिहास विषयाच्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभागी होत हे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले”.शनिवार दि. ७ फेब्रुवारी रोजी या प्रशिक्षण वर्गाचा समारोप संपन्न झाला. या सत्रात प्रशिक्षक व अतिथी प्राध्यापक महेश जोशी म्हणाले की, “ऐतिहासिक संशोधनासाठी मोडी लिपी प्रशिक्षण खूप गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना व एकूणच जाणकारांना खरा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर मोडी लिपीचे प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. आपण सर्वांनी मोडी लिपी समजून घेऊन आपला ऐतिहासिक ठेवा जतन करायला हवा”. समारोप सत्राच्या अध्यक्षा डॉ. सुरेखा भिंगारदिवे म्हणाल्या की, “विद्यार्थ्यांनी मोबाईलवर वेळ वाया घालविण्यापेक्षा मोडी लिपीचा  सराव केल्यास ते रोजगाराचे एक ठोस साधन बनू शकते”.
 या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय इतिहास विभाग प्रमुख डॉ दिलीप बागुल यांनी करून दिला. सूत्रसंचालन इतिहास विभागाचे प्रा. प्रवीण मोरे यांनी केले तर प्रा. अमोल बंद्रे यांनी उपस्थितांचे   आभार मानले. या प्रशिक्षणाचा तब्बल ५० विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. त्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आली. या संपूर्ण प्रशिक्षण सत्राचे आयोजन पदव्युत्तर इतिहास विभागाने केले. समारोप सत्रात गीतांजली कटारे, रामेश्वर निंबाळकर या विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रमासाठी अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ सुरेखा भिंगारदिवे, राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ एस एम देवरे, इतिहास विभाग प्रमुख व कोर्स  समन्वयक डॉ. दिलीप बागुल, कोर्स सहसमन्वयक प्रा. प्रवीण मोरे, प्रा. अमोल बंद्रे  यांची प्रमुख उपस्थिती होती.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!