शिर्डीत मध्यरात्री पोलिसांचा अॅक्शन मोड; चाकू अन् इंजेक्शनसह दरोड्याच्या तयारीतील टोळी ताब्यात!”

“शिर्डीत मध्यरात्री पोलिसांचा अॅक्शन मोड; चाकू अन् इंजेक्शनसह दरोड्याच्या तयारीतील टोळी ताब्यात!”


शिर्डीत मध्यरात्री पोलिसांचा अॅक्शन मोड; चाकू अन् इंजेक्शनसह दरोड्याच्या तयारीतील टोळी ताब्यात!”
शिर्डी । प्रतिनिधी । इंजेक्शनची नशा करून धारदार शस्त्रांच्या सहाय्याने मोठा दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या गुन्हेगारांच्या टोळीचा शिर्डी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून धारदार चाकू, मेफेड्रोन सिंथेटिक इंजेक्शनची बाटली, सहा सिरिंज आणि काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर मोटारसायकल असा एकूण ५० हजार ४२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शिर्डी परिसरात दरोड्याचा संभाव्य डाव उधळून लावण्यात पोलिसांना यश आले आहे.दि. १९ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास शिर्डी गावातील कालिकानगर ते बन रोड, राजगुरुनगर परिसरात काही सराईत गुन्हेगार मोठा गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची गुप्त माहिती शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांना मिळाली. माहितीची खात्री करून पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत कारवाई केली.
शिर्डी पोलिसांची सतर्कता; संभाव्य दरोडा उधळला!
गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी वेळीच कारवाई करून संशयितांना ताब्यात घेतले. धारदार शस्त्रांसह मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, फरार संशयिताचा शोध सुरू आहे
या कारवाईदरम्यान सावड्या उर्फ साईनाथ गोरक्षनाथ पाचारणे (रा. राजगुरुनगर, शिर्डी, ता. राहाता), कुणाल प्रकाश मुदलीयार (रा. पानमळा, शिर्डी, ता. राहाता), प्रथमेश बबन घोरपडे (रा. पानमळा, शिर्डी, ता. राहाता) आणि सौरव किरण गायकवाड (रा. सावळीविहीर, ता. राहाता) यांना ताब्यात घेण्यात आले. तर ‘मुसा नावाचा संशयित पोलिसांची चाहूल लागताच फरार झाला असून, त्याचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी संशयितांकडून खालील मुद्देमाल जप्त केला आहे
स्टीलचा काळ्या मुठीचा धारदार चाकू (२१ सेंटीमीटर लांबीचा).मेफेड्रोन सिंथेटिक इंजेक्शन आय.पी. ट्रामाडॉलची ३० एमएल बाटली. सहा रिकाम्या सिरिंज.
काळ्या रंगाची हिरो कंपनीची स्प्लेंडर मोटारसायकल.
एकूण जप्त मुद्देमाल : ५० हजार ४२५ रुपये. विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखलया प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ८२६/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३१०(४), ३१०(५) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या संशयितांविरुद्ध यापूर्वीही विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे (श्रीरामपूर) आणि शिर्डी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली करण्यात आली.पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे, सहायक पोलीस निरीक्षक कल्पेशकुमार चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक सागर काळे, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोराडे, पोलीस उपनिरीक्षक महादेव गुटे्ट, पोलीस हवालदार सुधाकर काळोखे, सफौ. सुरेश गोलवड, पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब ज-हाट, रमिज शेख, संतपाल शिंदे, दीपक कोल्हे व विजय धनेधर यांच्या पथकाने ही कामगिरी केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोराडे हे करीत आहेत


